खबर मिळाली पिस्तुलाची, निघाले सिगारेट लायटर!
By प्रदीप भाकरे | Updated: July 7, 2023 19:00 IST2023-07-07T19:00:00+5:302023-07-07T19:00:32+5:30
Amravati News इन्स्टाग्रामवर पिस्तुलासारखी वस्तू ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस सतर्क झाले आणि केलेल्या झाडाझडतीत हाती आला सिगरेट लायटर, ही घटना अमरावतीत घडली.

खबर मिळाली पिस्तुलाची, निघाले सिगारेट लायटर!
प्रदीप भाकरे
अमरावती: नागपुरी गेट भागातील एका २५ ते ३० वर्षे वयोगटातील तरूणाने पाठीमागे पिल्लरवर पिस्टलसारखी वस्तू ठेऊन इन्स्टावर व्हिडिओ व्हायरल केल्याची माहिती सायबर पोलिसांनी नागपुरी गेट पोलिसांना दिली. तेथील सहायक पोलीस निरिक्षक वैशाली चव्हान यांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन त्या अकाऊंटधारकाचा पत्ता मिळविला. त्याची झडती घेतली असता, व्हिडिओत दिसणारे पिस्टल नसून ते लायटर असल्याचे निष्पन्न झाले. अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान अंगझडतीत त्याच्याकडे फोल्डिंगचा चाकू आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ५ जुलै रोजी रात्री १० ते ११ या कालावधीत ती कारवाई फत्ते करण्यात आली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी सलमान शहा सुलतान शहा (३०, मुजफ्फर पुरा, अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. इन्स्टाग्रामवर सलमान सलाऊददीन नामक अकाउंटवर एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात एक तरूणाने पाठीमागे पिल्लरवर पिस्टलसारखी वस्तू ठेवल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याने नागपुरी गेटचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना दिली, तो २५ ते ३० वर्षे वयोगटातील तरूण नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचा संशय देखील सायबर पोलिसांनी व्यक्त केला. ती माहिती येताच प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरिक्षक वैशाली चव्हान यांनी पथकासह सलमान सलाऊददीन नामक इन्स्टाधारकाचा शोध घेतला.