शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अमृत आहारमध्ये नंदूरबार आघाडीवर, गडचिरोली माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:11 IST

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यासाठी सन २०१८-२०१९ या वर्षासाठी निधी मिळविण्यात नंदूरबार जिल्हा आघाडीवर असून, गडचिरोली जिल्हा मात्र माघारला आहे.

 निधी मंजूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून ७० टक्के वितरण अमरावती : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यासाठी सन २०१८-२०१९ या वर्षासाठी निधी मिळविण्यात नंदूरबार जिल्हा आघाडीवर असून, गडचिरोली जिल्हा मात्र माघारला आहे. राज्यात आदिवासीबहुल भाग असलेल्या १७ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जात आहे.  आदिवासी गरोदर मातेला अमृत आहार योजनेतून पोषण आहार दिला जातो. ही योजना मूलत: आदिवासी विकास विभागाची असली तरी ती प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडे शासनाने सोपविली आहे. आदिवासी गावे, पाडे, वस्त्यांमध्ये अंगणवाड्यांमधून गरोदर मातेला यातून पोषण आहार दिला जातो. त्याकरिता आदिवासी गरोदर आणि स्तनदा मातेला पोषण आहारासाठी दरदिवसाला २५ रुपये एवढी रक्कम दिली जाते. या योजनेतून अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठ्यासाठी पुरवठादार नेमण्यात आले आहेत. महिन्यातून २५ दिवस आहार देण्याची ही योजना आहे. त्यानुसार चालू वर्षाच्या प्रथम नऊ महिन्यांसाठी एकूण वार्षिक तरतुदीच्या ७० टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. ११ जानेवारी २०१७ च्या शासननिर्णयानुसार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेकरिता जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयातून थेट आहार समितीच्या बँक खात्यात वितरित करण्यात आला आहे. यात जिल्हानिहाय निधीची आकडेवारी बघितली, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी सर्वाधिक २४ कोटी ६९ लाख ४८ हजार १०० रुपये निधी, तर गडचिरोली जिल्ह्याला भोपळा मिळाला आहे. त्यामुळे आदिवासी गरोदर मातांसाठी अमृत आहार योजना गडचिरोली जिल्ह्यात राबविली जात नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

असा मिळाला जिल्हानिहाय निधीभारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी सन २०१८-२०१९ या वर्षात शासनाकडून ११ एप्रिल रोजी निधी वितरित झाला आहे. यात  ठाणे जिल्हा ६ कोटी ३० लाख, रायगड ४७ लाख ५३ हजार, पुणे १ कोटी ३० लाख २० हजार, सोलापूर ७०० रूपये, नाशिक १० कोटी ८८ लाख १२ हजार २०० रूपये, धुळे २ कोटी ८८ लाख, जळगाव १ कोटी ४० लाख, अहमदनगर १ कोटी ८९ लाख, नंदुरबार २४ कोटी ६९ लाख ४८ हजार,  नांदेड ३ कोटी ५० लाख,  नागपूर १ कोटी ३३ लाख, चंद्रपूर ८ कोटी ५ लाख, गडचिरोली शून्य, गोंदिया २ कोटी ८० लाख, अमरावती ४ कोटी २० लाख, यवतमाळ ५ कोटी ८८ लाख, पालघर जिल्ह्यासाठी १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती