शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांना न्याय देणारे व्यासपीठ - सुरेखा ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 20:14 IST

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत सुरेखा ठाकरे बोलत होत्या.

अमरावती : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणा-या महिलांचा सन्मान करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी पक्षात रुजविले. त्याला अनुसरून अमरावती विभागातील महिलांनी जोमाने कामाला लागून आपापल्या कार्यक्षेत्रात दखलनीय कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकरे यांनी केले.

अमरावतीत गुरुवारी आयोजित राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत सुरेखा ठाकरे बोलत होत्या. व्यासपीठावर माजी मंत्री वसुधा देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य आशा मिरगे, वर्षा निकम, जिल्हाध्यक्ष अर्चना हरडे, संगीता ठाकरे, क्रांती धोटे, शुभदा नाईक, महानगरप्रमुख सुचिता वनवे आदी उपस्थित होत्या.

परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी वर्ग संकटात आहे. सोबतच महिला बचत गट, शेतमजूर, महिला, युवती रोजगार आदी घटकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना न्याय मिळून देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला. त्याकरिता पक्ष संघटन मजबूत करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून सामाजिक कार्यास प्राधान्य दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येयधोरणानुसार ८० टक्के सामाजकारण आणि २० राजकारण यावर काम करावे, पक्षातील प्रत्येक महिला व युवतीचा खरा सन्मान करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. अमरावती विभागात महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने काम करण्याचा संदेश पक्षश्रेष्ठींचा आहे. महिला, युवती व अन्य कुठल्याही प्रश्नांबाबत अडचणी आल्यास त्यासाठी पक्षाचे नेते व पदाधिकारी कधीही आपल्यासोबत आहे, असा विश्र्वास सुरेखा ठाकरे यांनी बैठकीत दिला.व-हाडात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भरराष्ट्रवादी महिला काँग्रेसचे संघटन राज्यभर मजबूत आहे. मात्र इतर भागाच्या तुलनेत विदर्भात विशेषत: पश्चिम विदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसला अधिक मजबूत करण्यावर प्रदेश महिला काँग्रेसचा भर आहे. त्याअनुषंगाने प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने विभागीय आढावा बैठक घेण्यात आली. दुसºया टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात महिला काँग्रेसच्या बैठकी घेऊन पक्ष संघटन मजबूत केले जाईल. या सर्व कामांचा आढावा पक्षनेत्या खासदार सुप्रिया सुळे प्रत्येक बुथ, तालुका आणि जिल्हास्तरावर घेणार आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. सध्या राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता महाशिवआघाडीबाबत चर्चा होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जो निर्णय घेतील तो महिला काँग्रेसकडून त्यांचे स्वागत करणार असल्याचे सुरेखा ठाकरे व पदाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती