शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीही रस्त्यावर

By admin | Updated: January 10, 2017 00:08 IST

केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेधअमरावती : केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अन्यायी निर्णयाबद्दल भाजप शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड व ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट केला जात असेल तर अशा निर्णयाचे राकाँने स्वागतच केले. परंतु पूर्वनियोजन नसल्याने या निर्णयामुळे सामान्य जनतेची कोंडी झाली आहे, अशा प्रतिक्रिया राकाँच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केल्यात. शेतकऱ्यांचा आक्रोशअमरावती : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून सर्व व्यापार तसेच दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोजामुळे बँकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या धोरणांच्या निषेधार्थ राकाँच्यावतीने ९ जानेवारीला रोजी दुपारी १ वाजता जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड, माजीमंत्री शरद तसरे, वसुधा देशमुख, माजी अध्यक्ष विजय भैसे, अरूण गावंडे, बाबूराव बेलसरे, प्रल्हाद सुंदरकर, शेखर भोयर, निलिमा महल्ले, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, विजय बाभुळकर, दीपक नागपुरे, आनंद गुल्हाने, सुचिता वनवे, भास्कर ठाकरे, प्रवीण मेश्राम, जानराव डहाके, स्मिता घोगरे, राजेंद्र अग्रवाल, विनोद तलवारे, मनोहर गुल्हाने, सय्यद शकील, विश्वासराव मोरे, मातकर, ज्योती वानखडे, मोहन जाखड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडलीकापूस, सोयाबीन उत्पादकांसह ग्रामीण जनता नोटबंदीमुळे हैराण झाली आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव, बँकांचे खोळंबलेले व्यवहार यामुळे ग्रामीणांचे कंबरडे मोडले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचा दावा सरकार करीत असले तरी आतापर्यंत किती काळा पैसा जमा झाला, असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी उपस्थित केला. नोटाबंदीच्या काळात जिल्ह्यात किती काळा पैसा जमा झाला,असा प्रश्न यावेळी राकाँच्या नेत्यांनी उपस्थित केला.नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक भरपूर आले असताना सुद्धा भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप सुनील वऱ्हाडे यांनी केला आहे.