'कामयाब नहीं हुए, तो कोई तुम्हारा नहीं..' नवनीत राणांची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 18:20 IST2026-03-09T18:17:04+5:302026-03-09T18:20:31+5:30

Amravati : राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांच्या एका शॉर्ट व्हिडिओने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

Navneet Rana's emotional post 'Kamayab Nahin Huey, To Koi Tumhara Nahin..' | 'कामयाब नहीं हुए, तो कोई तुम्हारा नहीं..' नवनीत राणांची भावूक पोस्ट

Navneet Rana's emotional post 'Kamayab Nahin Huey, To Koi Tumhara Nahin..'

अमरावती : राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांच्या एका शॉर्ट व्हिडिओने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणा राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येतील, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, भाजपने संधी नाकारल्याने राणा समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण असतानाच, नवनीत राणा यांनी शेअर केलेली हिंदीतील पोस्ट आता वेगाने सोशल व्हायरल होत आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत जड अंतःकरणाने पण तितक्याच जिद्दीने म्हटले की 'हर बीतता वक्त तुम्हें ये याद दिला रहा है, अगर तुम कामयाब नहीं हुए, तो कोई तुम्हारा नहीं होता... तो उठीए, मेहनत करिए, डेडिकेशन से आगे बढ़िए, हर चीज पॉसिबल है।' हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. अनेकांनी 'संघर्ष करावाच लागतो, तुम्ही फिनिक्सप्रमाणे झेप घ्याल,' अशा शब्दांत त्यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे, काही युजर्सनी 'राजकारणात वेळ आणि यश असेल तरच सोबत मिळते,' असे म्हणत सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. २०१९ मधील अपक्ष विजय ते २०२४ मधील भाजपचा प्रवेश आणि त्यानंतरचा पराभव... हा त्यांचा प्रवास खडतर राहिला आहे. मात्र, 'संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही,' असे म्हणणाऱ्या राणा या नव्या वळणावरून कोणती सुरुवात करतात, याकडे राजकारण्यांसह नेटिझन्सचेदेखील लक्ष लागले आहे.
 

Web Title : नवनीत राणा का भावुक पोस्ट: 'कामयाब नहीं हुए तो कोई नहीं...'

Web Summary : राज्यसभा उम्मीदवारी चूकने के बाद, नवनीत राणा के भावुक वीडियो ने चर्चा छेड़ी। समर्थकों को वापसी की उम्मीद थी, लेकिन बीजेपी के इनकार से निराशा हुई। उनके पोस्ट में मेहनत और समर्पण पर जोर दिया गया है। सबकी निगाहें उनके अगले कदम पर हैं।

Web Title : Navneet Rana's emotional post: 'No one's yours if you fail...'

Web Summary : After missing Rajya Sabha candidacy, Navneet Rana's emotional video sparked discussion. Supporters hoped for her return, but BJP's denial led to disappointment. Her post emphasizes hard work and dedication amidst a challenging political journey. All eyes are on her next move.