शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

नवनीत राणा यांचा अचलपूर जिल्हानिर्मितीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 1:37 AM

प्रचाराला अवघे ११ दिवस शिल्लक असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ नुकतीच करजगाव येथील संत गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात जाहीर सभा पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: प्रचाराला अवघे ११ दिवस शिल्लक असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ नुकतीच करजगाव येथील संत गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात जाहीर सभा पार पडली. त्या जाहीर सभेदरम्यान नवनीत राणा यांनी अचलपूर जिल्हा निर्मितीचा निर्धार केला. खासदार झाल्यावर सर्वप्रथम आपण अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी केंद्राकडे ठोस पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.अचलपूरमध्ये नवीन एमआयडीसी तयार करून नवीन उद्योगांची उभारणी करू आणि त्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींना अधिकाधिक रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्याचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले. नवनीत राणा यांनी मावळते खासदार आनंदराव अडसूळ यांचा खरपूस समाचार घेतला. अडसूळ हे जिल्ह्याच्या विकासात गतिरोधकाचे काम करून विकासात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.अमरावतीच्या खासदाराचा पत्ता कांदिवली, मुंबई असा आहे. त्यांना त्यांच्या मूळ पत्त्यावर परत पाठविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित हजारो मतदारांना केले. करजगाव व परिसरातील गावांमध्ये संत्रा, पानपिंपरी या पिकांवर आधारित उद्योग निर्माण करून अनेकांना रोजगार प्राप्त करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या सभेला करजगाव व पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.भारतीय दलित पँथरचा पाठिंबामहाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणांना भारतीय दलित पँथरने पाठिंबा दर्शविला आहे. राजकमल चौकातील टाऊन हॉलमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दलित पँथरच्या पाठिंबा असल्याचे पत्र आनंद वरठे यांनी आमदार रवि राणा यांना दिले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक