शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

‘वोंब ऑफ मेळघाट’ माहितीपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचा द्वितीय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

पुनर्वसनग्रस्त आदिवासींच्या व्यथा, नवी दिल्लीत झालेल्या लघु चित्रपट महोत्सवात यश पंकज लायदे/धारणी (अमरावती) : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार ...

पुनर्वसनग्रस्त आदिवासींच्या व्यथा, नवी दिल्लीत झालेल्या लघु चित्रपट महोत्सवात यश

पंकज लायदे/धारणी (अमरावती) : नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भारत सरकारच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोग लघुचित्रपट महोत्सव २०२० स्पर्धेत महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजविले. विजेते चित्रपट मानवी हक्कांचे होत असलेले हनन आणि सामाजिक उपेक्षा यांवर प्रकाश टाकतात. आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या माहिती पत्रकात अत्यंत मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारात दोन लक्ष रुपयांचा प्रथम पुरस्कार रवींद्र माणिक जाधव यांच्या ‘थलसार बंगसार’ या कोकणी लघुपटाला देण्यात आला, तर दीड लक्ष रुपयांचे सामायिक द्वितीय पारितोषिक डॉ. नितीन वसंतराव गणोरकर यांच्या ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ आणि थोमास जाकोब यांच्या ‘अन्नाम’ या मल्याळी लघुचित्रपटाला बहाल करण्यात आला. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या सहाव्या लघुचित्रपट महोत्सवात संपूर्ण भारतातून ९३ स्पर्धकांची नोंद झाली.

‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ हा माहिती चित्रपट निसर्गाशी वंशागत जुळून असलेल्या मेळघाटमधील आदिवासी समुदायाचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून विस्थापनानंतर किती सामाजिक आणि प्रशासनिक समस्यांशी झुंजतो, हे या माहितीपटात मुख्यतः चित्रित केलेले आहे. ९ मिनिट ५४ सेकंदाची लांबी असलेला हा माहितीपट महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायद्यातील तरतुदींच्या प्रशासनिक उल्लंघनावर प्रखरपणे प्रकाश टाकतो.

व्याघ्र संवर्धन प्रकल्पबाधित मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी बांधवांच्या उपेक्षा आणि विवंचना, शासन यंत्रणेकडून होत असलेला प्रचंड मनस्तापाचा उलगडा चुर्णी, वैराट आणि पस्तलाई गावच्या पुनर्वसित प्रकल्पबाधितांनी केला. सन २००१-०२ पासून ते २०१८ पर्यंत बोरी, कोहा, कुंड, चुर्णी, वैराट, अमोना, नागरतास, बरुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपानी, डोलार आणि पस्तलई या आदिवासी गावांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. प्रकल्पबाधितांना मूलभूत सोई-सुविधांपासून शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे, असे पुनर्वसित आदिवासी ग्रामस्थ सांगतात.

‘वोंम्ब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण आणि संपादन ऋषीकेश खंबायत यांनी केले. मूर्त रूप साकारण्यासाठी डॉ. निशा केमसे-कांबळे यांनी उत्पाद नेपथ्य विभाग सांभाळला. प्रा. स्वप्निल कांबळे यांचे सहदिग्दर्शन करून मोलाचे मार्गदर्शक योगदान राहिले. ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’चे चित्रीकरण करण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य फर्ग्युसन कॉलेज (पुणे), टाटा सामाजिक विज्ञान (मुंबई), अमरावती जिल्हाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभाग कर्मचारी आणि अपर आयुक्त आदिवासी विकास विभागाचे सहकार्य लाभले. माहितीपटाला निर्मिती अर्थसाहाय्य शिल्पा शिवणकर-कांबळे, ऋषीकेश कीर्तीकर, डॉ. संदीप राऊत, अनिरुद्ध राऊत, ज्ञानेश्वर बांगर, जय प्रकाश, गौतम पाटील, उत्तम साहू, रोहिणी शिवकुमार, नेहा राय, अजित कुमार पंकज, दीप चंद यांनी केले तसेच आशिष तरार, श्रेयस पन्नासे, शंतनु पुंड, राहुल तऱ्हेकर, साक्षी आंबेकर, रोहिणी बुंदेले, माधुरी गणोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.