शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रे नसलेल्या ७० हजार मतदारांची नावे वगळली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

अमरावती : मतदार यादीत अद्यापही छायाचित्र अपडेट नसलेल्या मतदारांना जिल्हा व तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात ...

अमरावती : मतदार यादीत अद्यापही छायाचित्र अपडेट नसलेल्या मतदारांना जिल्हा व तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तथापि, अद्यापही सुमारे ७० हजार मतदारांचा तपशील उपलब्ध नाही. घरभेटी दिल्यानंतर अनेक मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळले आहे. १५ जुलैपर्यंत या ‘नो फोटो व्होटर्स’ची छायाचित्रे जमा न झाल्यास ती वगळण्यात येतील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.

छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्याचे कार्य जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून होत आहे. हे राष्ट्रीय कार्य सुरू असल्यामुळे संबंधित मतदारांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करताना नवाल म्हणाले की, ‘नो फोटो व्होटर्स’ची छायाचित्रे मिळवून मतदार यादी निर्दोष करण्यासाठी गावपातळीपासून सर्वत्र प्रयत्न होत आहे. मात्र, अनेक मतदार नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मोहिमेत त्यातील अनेक मतदारांचा शोध लागून छायाचित्रे जमा झाली. मात्र, ७० हजारांपर्यंत मतदारांनी अद्यापही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पत्त्यांवर न आढळणाऱ्या व प्रतिसाद न देणाऱ्या मतदारांना वगळले जाणार आहे.

पत्त्यांवर न आढळणाऱ्यांबाबत पंचनामेही सुरू

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दयार्पूर, मेळघाट, अचलपूर व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या अद्ययावत होत आहेत. त्यासाठी मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्रे मिळवून ते यादीत अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीही देतात. मात्र, अनेकदा मतदार यादीत नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत पंचनामे करून अशा मतदारांची नावे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी अधिनियम, १९६० मधील तरतूद व भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी दिली.

मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील (नो फोटो व्होटर्स) अशा मतदारांची यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून पडताळणीही होत आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी १५ जुलैपूर्वी आपली छायाचित्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालय किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.