शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मेळघाटातील सागवानाची ओळख सांगणारे खिळे आणि बिंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:14 IST

खिळा आणि बिंदीवर मेळघाटातील सागवान देशभर ओळखल्या जाते. बिंदी आणि खिळा यांनी मेळघाटातील सागवानला ओळख दिली असून, आॅनलाइन लिलावात त्याला महत्त्व प्राप्त आहे. यातून कोट्यवधीचा राजस्व शासनाला मिळत आहे.

ठळक मुद्देया विक्रीतून एकट्या परतवाडा डेपोतूनच वर्षाकाठी १५ ते २५ कोटींचा महसूल वनविभागाला पर्यायाने शासनाला मिळतो.

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खिळा आणि बिंदीवर मेळघाटातील सागवान देशभर ओळखल्या जाते. बिंदी आणि खिळा यांनी मेळघाटातील सागवानला ओळख दिली असून, आॅनलाइन लिलावात त्याला महत्त्व प्राप्त आहे. यातून कोट्यवधीचा राजस्व शासनाला मिळत आहे.पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत परतवाडा येथे लाकडाचा मोठा शासकीय डेपो आहे. या डेपोत मेळघाट जंगलातील लाकूड पाठविताना त्याचे चालान बनविले जाते. या चालानवर त्या लाकडाची लांबी, रुंदी, गोलाई, कुपनंबर, वनर्तुळ, वनखंड क्रमांकासह वनपरिक्षेत्राचे नाव नमूद असते. पुढे हे चालान डेपोतील लाकडावर चालविले जाते. हे चालान चालवताना त्या लाकडावर लाकडाची लांबी, गोलाई आणि जंगल व डेपोची ओळख, लॉट नंबर लोखंडी खिळ्यांच्या साहाय्याने अंकित केला जातो. याकरिता मान्यताप्राप्त, नोंदणीकृत अशा खिळ्यांचाच वापर वनविभागाकडून केला जातो. हातोडीच्या सहाय्याने खिळे मारण्याचे कौशल्य अवगत असलेला कर्मचारी किंवा खासगी व्यक्तीच हे काम करू शकतो. लोखंडी छन्नीसारखे असलेल्या या खिळ्यांवर शून्यापासून नऊपर्यंत अंक कोरलेले असतात. या अंकाचीही स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे.चालान चालवताना जंगलातून डेपोत आलेल्या प्रत्येक लाकडावर त्यानुसार लाकडाची माहिती स्पष्ट करणारे खिळे मारल्या जातात. मारलेल्या खिळ्यांवरून मेळघाटातील लाकूड देशपातळीवर कुठेही ओळखता येते. या खिळ्यांवरूनच लाकूड कुठल्या डेपोचे, कुठल्या जंगलातले, कुठल्या कुपातील व कुठल्या लॉटमधील आहे, याची माहिती उपलब्ध होते.खिळे मारल्यानंतर लाकडाचे एकूण ७७ श्रेणींमध्ये विभागणी केली जाते. ग्रेडिंगवरून लाकडाचा दर्जा माहीत होतो. ग्रेडिंगमध्ये एकूण सहा बिंदीचा वापर केला जातो. ही बिंदी म्हणजे पिवळ्या रंगाचा ठिपका. उत्तम दर्जाच्या लाकडावर एक ठिपका म्हणजे एक बिंदी, तर ग्रेडिंगनुसार दोन बिंदी, तीन बिंदी, चार बिंदी, पाच बिंदी, सहा बिंदी चढविल्या जातात. म्हणजेच पिवळ्या रंगाच्या आॅइलपेंटचे ते ठिपके लाकडाच्या दर्शनी भागावर खिळ्यांच्या बाजूला लावले जातात.परतवाडा डेपोतून २५ कोटींचा महसूलखिळे आणि बिंदीनुसार लाकडाची शासकीय किंमत निर्धारित केली जाते. खिळे आणि बिंदीनुसार ग्रेड-लॉट लिस्ट बघून देशभरातील व्यापारी आॅनलाइन लिलावात आपआपल्या ठिकाणी बसूनच बोली करतात आणि आपल्या पसंतीचे लाकूड खरेदी करतात. त्यांच्या नजरा या खिळा आणि बिंदीवरच असतात.

सागवानला मागणीमेळघाटातील सागवानाला आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगढ, कर्नाटकसह महाराष्ट्रात मोठी मागणी आहे. यासोबतच नागपूर (विदर्भ) मध्ये आरागिरणीवर कापून कटसाइज लाकूड देशभर पाठविले जाते. या सर्व राज्यांतील व्यापारी आॅनलाईन लिलाव पद्धतीत आपला सहभाग देतात.

टॅग्स :forest departmentवनविभाग