शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

महापालिका निवडणूक : महिला आरक्षण जाहीर, भाऊ-दादांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

९८ सदस्यीय अमरावती महापालिकेत ४९ महिला सदस्य असतील. त्या अनुषंगाने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता  एस.सी., एस.टी. व सर्वसाधारण महिलांसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली. महापालिका शाळेतील बालकांच्या हस्ते ती सोडत काढली गेली; तर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ते आरक्षण घोषित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीसाठीची बहुप्रतीक्षित महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांसमोर प्रभाग बदलून निवडून येण्याचे आव्हान असणार आहे; तर, अनेक ठिकाणी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी एकाच पक्षाच्या दोन मावळत्या नगरसेवकांमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. एकूण ९८ पैकी तब्बल ३२ जागा खुल्या असून, तेथेच सर्वाधिक चुरस व स्पर्धा असेल. एकंदरीतच महिला आरक्षणाने अनेकांची समीकरणे बिघडविली आहेत.९८ सदस्यीय अमरावती महापालिकेत ४९ महिला सदस्य असतील. त्या अनुषंगाने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता  एस.सी., एस.टी. व सर्वसाधारण महिलांसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली. महापालिका शाळेतील बालकांच्या हस्ते ती सोडत काढली गेली; तर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ते आरक्षण घोषित केले. मंगळवारी एस.सी.साठी राखीव असलेल्या १७ जागांपैकी ९, एस.टी.च्या दोनपैकी एक व सर्वसाधारण संवर्गातील नऊ जागांवरील महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीसाठी अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी भवन गाठून आपापल्या प्रभागांतील समीकरणे जाणून घेतली. सोडतीसाठी उपायुक्त सुरेश पाटील, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे उपस्थित होते.

साईनगरातून माजी महापाैर की भारतीय?साईनगर प्रभागातील अ जागा एससी महिला, ब जागा खुली महिला अशी आरक्षित आहे; तर क जागा खुली आहे. गतवेळी माजी महापौर चेतन गावंडे व तुषार भारतीय येथून निवडून आले. मात्र यंदा एकच जागा खुली असल्याने तेथे तुषार भारतीय की चेतन गावंडे हा यक्षप्रश्न भाजपसमोर उभा ठाकणार आहे. कुणाला उमेदवारी मिळेल, याकडे लक्ष आहे. 

बुधवारा प्रभागात इंगोले व्हर्सेस कलोती?बुधवारा प्रभागातील क जागा खुली आहे. त्यामुळे माजी महापौर विलास इंगोले व माजी स्थायी सभापती विवेक कलोती समोरासमोर ठाकण्याची चिन्हे आहेत. गतवेळी ते एकाच प्रभागातून निवडून आले असले तरी त्यांची समोरासमोर लढत झाली नव्हती. विक्रमादित्यासमोरची लढत टाळायची असेल, तर कलोतींना प्रभाग बदलल्याशिवाय पर्याय नाही.

भाजपची तिकिटे कुणाला मिळणार?मागील निवडणुकीत काही प्रभागांत भाजपचे संपूर्ण पॅनेल निवडून आले. मात्र यंदाची तीनसदस्यीय प्रभाग प्रणाली व महिला आरक्षणामुळे जागा एक आणि मावळते नगरसेवक दोन अशी परिस्थिती उद्भवली आहे. नवाथे अंबापेठचे उदाहरण घेतल्यास तेथून भाजपचे प्रणित सोनी व अजय सारस्कर निवडून आले. मात्र यंदा या प्रभागात एकच जागा खुली आहे. गडगडेश्वर प्रभागातही भाजपचे सचिन रासने व आशिष अतकरे हे दोन मावळते नगरसेवक आहेत. 

खु्ल्या जागेवर मदार

९८ पैकी ४० जागा खुल्या आहेत. त्यांत सर्वाधिक ३२ जागा ‘क’ आहेत; तर ‘ब’मध्ये देखील ८ जागा सर्वसाधारण आहेत. त्यामुळे सर्वाधिक चुरस या ४० जागांवर असेल. महिलांसाठी असलेल्या ४९ जागांपैकी ३९ सर्वसाधारण, ९ एससी व एक एस.टी.ची आरक्षित आहे. १६ प्रभागांत प्रत्येकी दोन महिला असतील.

खुल्या प्रवर्गात चुरस

महिला आरक्षणाने अनेेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. अनेकांना घरातील महिलांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतील. खुल्या प्रवर्गात चुरस असेल. 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक