शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका ३० लाखांत खरेदी करणार दोन गॅस, एक विद्युत दाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कोरोनाने मृत्युसंख्या वाढत असल्याने मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने कोविड ...

ठळक मुद्दे३० लाखांचा खर्च अपेक्षित, जेम पोर्टलवर आठ दिवसांत होणार प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाने मृत्युसंख्या वाढत असल्याने मृतदेहांचे अंत्यविधी करण्यासाठी नियोजन कोलमडले आहे. परिणामी महापालिका प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक निधीतून दोन गॅस दाहिनी, तर एक विद्युत दाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता जीईएम (जेम) पोर्टलवर आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूपश्चात मृतदेहावर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो. कोविड, नॉन कोविड रुग्णांची मृत्युसंख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधीच्या वेळी प्रचंड ताण येत आहे. गॅस दाहिनीत एका कोरोना मृतदेहाकरिता दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे मृतदेहांकरिताही रांगा लागण्याची वेळ आली आहे. हा ताण कमी करण्यासाठी इतर स्मशानभूमींसाठी दोन गॅस दाहिनी, एक विद्युत दाहिनी खरेदीसाठी निविदा प्रक्रियेला मान्यता प्रदान करण्यात आली. एका प्रकल्पासाठी अंदाजे १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार ३० लाख रुपयांचा खर्च कोविड प्रतिबंधात्मक निधीतून केला जाणार आहे. जेम पोर्टलवर ही निविदा मागविली जाणार असून, सोमवारी ई-निविदा प्रारंभ होईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. विलासनगर, शंकरनगर स्मशानभूमीत प्रत्येकी एक गॅस दाहिनी, तर विद्युत दाहिनी ही हिंदू स्मशानभूमीत कार्यान्वित होईल. 

निविदा काढण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. जेम पोर्टलवर लघुनिविदेने ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. गॅस दाहिनी, विद्युत दाहिनी कार्यान्वित करण्यासाठी स्थळ निश्चित केले जाणार आहे. दोन ते तीन स्मशानभूमी विचाराधीन आहेत. 
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी पर्यायी व्यवस्थेची मागणी 
हिंदू स्मशानभूमीत सकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी केला जाताे. गॅस दाहिनी आणि सरणावरील अंत्यसंस्कारामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात धुराचे कण वायूद्वारे येत असल्याच्या  तक्रारी नुकत्याच करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत राेडे यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने दोन गॅस, एक विद्युत दाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू