शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील कंत्राटे बगलबच्च्यांनाच !

By admin | Updated: October 10, 2016 00:17 IST

नागरिकांकडून करांच्या माध्यमातून वसूल होणाऱ्या कोट्यवधी रुपयांमधून शहरात विकासकामे केली जातात.

सत्तेचा गैरवापर : यंत्रणेचा कानाडोळा अमरावती : नागरिकांकडून करांच्या माध्यमातून वसूल होणाऱ्या कोट्यवधी रुपयांमधून शहरात विकासकामे केली जातात. मात्र त्या रुपयांच्या कामाची कंत्राटे सत्ताधिशांच्या बगलबच्च्यांना दिले जात असल्याचे वास्तव उघड झाले आहे.आठ लाख अमरावतीकरांच्या खिशातून दरवर्षी मालमत्ता कर आणि अन्य करांमधून सुमारे १०० कोटी रुपये संकलित करण्यात येतात. त्यातून मूलभूत सुविधांसह अन्य विकासकामे केली जातात. मात्र स्पर्धेत न उतरता अनेक कामे आप्तस्वकीयांना दिले जातात. याशिवाय निविदा प्रक्रिया मॅनेज करून आपला टक्काही पक्का केला जातो. महापालिकेत कुठलेही काम विनाकमिशन केले जात नसल्याची अमरावतीकरांची पक्की धारणा बनली आहे. अर्थसत्ता हाती असल्याने त्याचा लाभ आप्तस्वकीयांसह मर्जीतील बगलबच्च्यांनाच व्हावा, यासाठी एक यंत्रणाच महापालिकेत उभारण्यात आली आहे. विरोधकांच्या तुलनेत सत्ताधिशांचा यंत्रणेवर अनामिक दबाव असतो. त्यामुळेच नियमांची पायमल्ली करीत शासननिर्णयाच्या चाकोरीला ठेंगा दाखवीत काका, मामा, भाऊ व अन्य सोयऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची कंत्राटे घेतली जातात. स्वच्छतेपासून सुरक्षारक्षक पुरविण्यापर्यंत बहुतेक सारे कंत्राट विशिष्ट व्यक्तींपुरते मर्यादित झाले आहे. यातील बहुतांश कंत्राटदार राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आतल्या गोटातील आहेत. ही बाब कुणीही नाकारू शकत नाही. मात्र उघडपणे कुणीही बोलण्यास पुढे येत नसल्याने या बगलबच्च्यांचे चांगलेच फावले आहे. (प्रतिनिधी)महापालिका कर्मचाऱ्यांची भागिदारी महपालिका आस्थापनेवर असलेल्या काहींनी भागिदारीमध्ये कंत्राटदारीचा व्यवसाय सुरू केला आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. सत्ताधिशांशी असलेल्या जवळीकीचा अर्थपूर्ण लाभ घेण्यासाठी ही मंडळी सरसावली आहे.त्याची भूमिका काय ?अमरावती महापालिका स्मार्टसिटीच्या मुख्य आणि पुरवणी परीक्षेला सामोरी गेली. मात्र दोन्ही वेळा महापालिका उत्तीर्ण होऊ शकली नाही. मुळात या परीक्षेचे नियोजन एका अतिहुशार अर्बन प्लॅनरमुळे बिघडल्याचे सर्वश्रुत आहे. उल्लेखनीय म्हणजे या ‘स्मार्ट’ व्यक्तिविरोधात पुण्यामध्ये फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल आहे. मात्र आजकाल तोच गळ्यातील ताईत बनल्याने यंत्रणेला अशा व्यक्तीत काय ‘इंटरेस्ट’ असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 'स्मार्ट डीपीआर'चे वाटोळे करणाऱ्या या व्यक्तीने पुन्हा स्मार्टसाठीच लुडबुड चालविली आहे.