शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

MPSC Exam Postponed: अमरावतीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, २३ विद्यार्थी डिटेन करून सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 23:00 IST

एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतन समोर विद्यार्थ्यांनी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. (Amravati students agitation)

अमरावती: राज्य शासनाने कोरोना संसर्गामुळे रविवारी, १४ मार्च रोजी होऊ घातलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करीत गुरुवारी दुपारी ४ वाजता येथील पंचवटी चौकात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आंदोलन पुकारले होते. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलनाला उग्र स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यावेळी माजीमंत्री अनिल बोंडे यांच्यासह २३ विद्यार्थ्यांना डिटेन करून सोडण्यात आले. (MPSC Exam Postponed: Violent turn in Amravati students agitation, 23 students detained and released)

पोलिसांनी अंधार करून केली MPSCच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड, गोपीचंद पडळकरही ताब्यात

एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतन समोर विद्यार्थ्यांनी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. त्यानुसार तंत्रनिकेतन ते पंचवटी चौकदरम्यान विद्यार्थी पायी चालत गेले. पंचवटी चौकात चक्काजाम आंदोलन केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार नारेबाजी करीत मागण्यांकडे लक्ष वेधले. 

यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांचा विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू करताच धावपळ सुरू झाली. यात आघाडीवर असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात १९ मुले, तर चार मुलींना डिटेन करून सोडण्यात आले. तासभर चाललेल्या आंदोलनासाठी गाडगेनगर पोलीस, एसआरपीएफ, क्यूआरटी पथक तैनात होते.

Uddhav Thackeray on MPSC Exam: येत्या आठवडाभरात MPSC परीक्षा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 

अनिल बोंडे म्हणाले, चोरमले ‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’ - एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी चौकात पुकारण्यात आलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना डिटेन करून पोलीस व्हॅनमधून नेले जात होते. यावेळी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे हे घटनास्थळी पोहोचले. पोलीस व्हॅनमधून नेण्यात येणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बोंडे हे व्हॅनचे दार उघडण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा एका पोलीस उपनिरीक्षकांनी त्यांना मज्जाव केला आणि अनिल बोंडे आक्रमक झाले. विद्यार्थी हे स्वत:च्या हक्कासाठी लढा देत आहेत, असे बोंडे म्हणाले. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले हे पोलीस व्हॅनजवळ पोहोचले. त्यानंतर अनिल बोंडे आणि आसाराम चोरमले यांच्या शाब्दिक वाद सुरू झाला. कोरोना काळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा, असे ठाणेदार चोरमले म्हणाले. संयमाने बोला, संयम शिकवू नका, असे बोंडे चोरमलेंना म्हणाले. मुलींना पोलीस व्हॅनमधून कोंबून नेले जात असताना महिला पोलीस सोबत नाही, ते काही चोर नाहीत, असा मुद्दा बोंडे यांनी उपस्थित केला. चोरमले तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून झाले का, असे बोंडे म्हणाले. आंदोलकांना संधी दिली आहे, असे ठाणेदार चोरमले म्हणाले. तेव्हा बोंडे हे चोरमले यांना ‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’, असे एक नव्हे दोन वेळा म्हणाले. यावेळी बोंडे आणि चोरमले यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ झाली. त्यानंतर ठाणेदार चोरमले यांनी बोंडे यांना पोलिसांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यात.

'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!

एमपीएसीच्या परीक्षा नियोजित वेळेतच व्हाव्यात, या मागणीसाठी संवैधानिक मार्गाने रस्ता आंदोलन करण्यात आले. अगोदरच चार ते पाच वेळा या परीक्षा पोस्टपोन झाल्या आहे. मात्र, पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. मुलींना पांगविण्यासाठी काठ्या फेकून मारल्यात. पोलीस व्हॅनमधून आरोपींसारखे नेण्यात आले. ही बाब अन्यायकारक आहे, असे अक्षय नरगळे या आंदोलक विद्यार्थ्याने म्हटले आहे.

कोरोना काळात आरोग्य, रेल्वे, एनसीबीसी, फार्मसीच्या परीक्षा झाल्या, तर एमपीएसीच्या का नाही? याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी संवैधानिक मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दहशतवादी असल्यासमान वागणूक दिली. लाठीमार करून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, असे किरण मोरे या आंदोलक विद्यार्थ्याने म्हटले आहे. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीAmravatiअमरावतीPoliceपोलिस