खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 13:51 IST2022-01-23T12:10:34+5:302022-01-23T13:51:48+5:30

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

MP Navneet Rana, MLA Ravi Rana tested corona positive again | खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देसंपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून संपर्कात आलेल्यांनी त्यांची चाचणी करून घ्यावी व खबरदारी बाळगावी असे आवाहन दोघांनी केले आहे. 

अमरावतीत काही दिवसांआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आल्यानंतर मनपाने तो हटवला यावरुन चांगलेच वादंग निर्माण झाले होते. त्यांच्या घरापुढे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. या व्यतिरिक्त राणा दाम्पत्य काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात सहभागी होत होते. तर, आता दोघांनाही कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन राणा दाम्पत्यानी केलं आहे.

दरम्यान, अमरावतीमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात जानेवारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला आहे. या २२ दिवसांत ४, २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. तर, दुसरीकडे संसर्ग वाढत असतानाही बहुतेक नागरिक सर्सासपणे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे.

Web Title: MP Navneet Rana, MLA Ravi Rana tested corona positive again