शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या उत्थानासाठी मोर्शीत कार्यालय !

By admin | Updated: May 11, 2016 00:39 IST

वरुड-मोर्शी तालुक्यातील आदिवासी बांधवांना व विद्यार्थ्यांना आदिवासी विकासाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ घेता यावा, ....

राजे अंबरिश आत्राम : २०१९ पर्यंत सर्व आदिवासी कुटुंबांना घरकुलाचा लाभअमरावती : वरुड-मोर्शी तालुक्यातील आदिवासी बांधवांना व विद्यार्थ्यांना आदिवासी विकासाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ घेता यावा, यासाठी मोर्शी येथे सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय निर्माण करणार असल्याची घोषणा आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्राम यांनी शनिवारी केली.मोर्शी तालुक्यातील एकूण ११ कोटी ३१ लक्ष ९९ हजार रुपयांच्या विविध आदिवासी विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आत्राम यांच्या हस्ते सोमवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. विकासकामांमध्ये आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे भूमिपूजन, अंबाडा-सायवाडा येथील आदिवासी शासकीय भवनाचे भूमिपूजन व धानोरा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीचे लोकार्पण आदी कामांचा समावेश आहे. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, वर्धा मतदारसंघाचे खा. रामदास तडस, मोर्शी-वरुड मतदारसंघाचे आ. अनिल बोंडे, धारणीचे प्रकल्प अधिकारी षणमृगराजन एस., सहायक प्रकल्प अधिकारी पेढेकर, वसुधा बोंडे, जि.प. सदस्या अर्चना मुरुमकर, सविता धुर्वे, अंबाडा येथील सरपंच सुलोचना कंगाले तसेच आर्ट आॅफ लिव्हिंगचे कार्यकर्ते उपस्थित होते.पालकमंत्री प्रवीण पोटे आपल्या भाषणात म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात पाच टक्के निधी हा आदिवासी समाजाच्या विकासासाठी खर्च केला जातो. गेल्यावर्षी आदिवासी विकास विभागाने सुमारे १८० कोटींचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग केला आहे. या निधीचा उपयोग आदिवासी बांधवांनी आपल्या गावांचा विकास व मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण करण्यासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले. खा.रामदास तडस यांनी आदिवासी विकास राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना करून दिली.मोर्शी-वरुड परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण निवासासह घेता यावे, यासाठी या दोन्ही तालुक्यांत मुलांसाठी दोन व मुलींसाठी दोन असे चार २५०-३०० विद्यार्थिक्षमता असलेले वसतिगृह उभारण्याची मागणी बोंडे यांनी केली. आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी आदिवासी विकास विभागाने विशेष सहकार्य करावे. तीनही भूमिपूजन व लोकार्पण तसेच सामूहिक आदिवासी विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला मोर्शी, अंबाडा-सायवाडा, धानोरा व भिवकुंडी गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)