अमरावती विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकनाचा मुहूर्त निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:26+5:302021-07-21T04:11:26+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेची (नॅक) चमू ९. १० व ११ ऑगस्ट ...

अमरावती विद्यापीठाचे ‘नॅक’ मूल्यांकनाचा मुहूर्त निघाला
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेची (नॅक) चमू ९. १० व ११ ऑगस्ट असे तीन दिवस मू्ल्यांकन करणार आहे. गत सात महिन्यांनंतर आता ‘नॅक’ मूल्यांकनाची प्रतीक्षा संपणार आहे.
अमरावती विद्यापीठाने ‘नॅक’ मूल्यांकनासाठी सेल्फ स्टडी रिपोर्ट (एसएसआर) ऑनलाईन पाठविला आहे. त्यानुसार ७० टक्के कागदपत्रे रवाना झाली असून, ३० टक्के कामे ही चमू प्रत्यक्षात तपासणार आहे. यात प्रत्येक विभागाचे सादरीकरण, पायाभूत सुविधा, सामाजिक उत्तरदायित्व, विद्यार्थ्यांशी संवाद, माजी विद्यार्थ्यांची कर्तव्यपूर्ती आदी ‘नॅक’ची चमू पाहणी करणार अशी माहिती कुलसचिव तुषार देशमुख यांनी दिली.
--------------------
प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी पदभार स्वीकारला
अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्र-कुलगुरू म्हणून राजेश जयपूरकर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे. यावेळी कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश माहेरील, उपकुलसचिव प्रवीण राठोड, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर आदी उपस्थित होते. जयपूरकर हे पुन्हा दुसऱ्यांदा प्र-कुलगुरु झाले आहेत.