लैंगिक शोषणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: November 8, 2022 14:19 IST2022-11-08T14:18:15+5:302022-11-08T14:19:09+5:30

बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल

Minor girl pregnant from sexual abuse; A case has been registered against the accused | लैंगिक शोषणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लैंगिक शोषणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती : वारंवार केलेल्या लैंगिक शोषणातून एक अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी आरोपी महेश भगवंत इंगोले (२२, रा. वाढोणा रामनाथ) याच्याविरुध्द बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपी महेशने पिडीत अल्पवयीन मुलीस प्रेमजाळ्यात ओढले. पुढे तिला लग्नाचे आमिष दिले. ती त्या भुलथापांना बळी पडली. त्यातून आरोपीने त्या अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यातून ती गर्भवती राहिली. दरम्यान आपल्याला गर्भधारणा झाली, हे तिला उशिराने कळले. त्याबाबत तिने आरोपीला देखील सांगितले. मात्र त्याने त्यानंतर नकार दिला. अखेर ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिने मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाणे गाठले. महिला पोलिसांनी तिचे बयान नोंदवून घेत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Minor girl pregnant from sexual abuse; A case has been registered against the accused