अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भधारणा झाल्याने प्रकार उघडकीस

By प्रदीप भाकरे | Published: November 4, 2022 05:12 PM2022-11-04T17:12:07+5:302022-11-04T17:15:51+5:30

तपासणीनंतर गाठले पोलीस ठाणे

Minor gets pregnant after repeated sexual assault | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भधारणा झाल्याने प्रकार उघडकीस

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भधारणा झाल्याने प्रकार उघडकीस

googlenewsNext

अमरावती : वारंवार केलेल्या लैंगिक शोषणातून एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र दयाराम नेवारे (३५) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

तक्रारीनुसार, पीडिता १५ वर्षीय मुलीचे आई-वडील बाहेर गेल्यावर आरोपी रवींद्र हा तिच्या घरी जात होता. या काळात तू मला आवडते, असे म्हणून रवींद्रने पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. प्रकाराची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.

दरम्यान, पीडिताची प्रकृती बिघडली. त्यामुळे ती आईसोबत अमरावती येथील एका रुग्णालयात गेली. यावेळी तपासणीनंतर डॉक्टरांनी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडिताने आईसह चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रवींद्र नेवारे याच्याविरुद्ध बलात्कार, जिवे मारण्याची धमकी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Minor gets pregnant after repeated sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.