शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात कामकाज  राहणार सुरू; अधिवेशन काळात अलर्ट राहण्यासाठी डेप्युटी सीईओंच्या सूचना

By जितेंद्र दखने | Updated: December 4, 2023 22:49 IST

विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

अमरावती : राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ तारखेपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक तातडीची माहिती तसेच कागदपत्रे मागवले जातात. त्यांची पूर्तता आणि कामाची विभागणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे कार्यालयात संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत तसेच शनिवारच्या शासकीय सुटीच्या दिवशी जिल्हा परिषद सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी घेतला आहे. तसेच विभागप्रमुखांनीही मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेण्याबाबत आदेश काढले आहेत. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे.या अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी संबंधित मंत्रालयाचे अधिकारी स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांना संपर्क करतात. वास्तविक काही वेळा सुटी असल्याने उत्तरे मिळत नाहीत, याशिवाय तसेच सुटीच्या दिवशी मंत्री व अधिकारी यांचे दौरेही जिलह्यात असतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओंनी शनिवारच्या शासकीय सुट्या रद्द केल्या आहेत व कार्यालय सुटण्याच्या वेळपेक्षा अर्धा तास मुख्यालयात थांबावे, अशा सूचना दिल्या आहेत.नागपूर येथे हिवाळी अधिवेशन येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरे मागविली जातात. ज्या ज्या विभागाचे संबंधित प्रश्नांच्या अनुषंगाने विधिमंडळाने माहिती मागविली आहे. ती माहिती तसेच वेळेवर लागणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने खातेप्रमुख, कर्मचारी यांनी अधिवेशन कालावधीत मुख्यालय सोडू नये, तसेच सुटीच्या दिवशी कार्यालयात हजर राहावे, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.- डॉ. कैलास घोडके, डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन विभाग जि. प.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावतीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन