शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
6
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
7
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
8
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
9
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
10
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
11
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
12
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
13
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
14
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
15
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
16
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
17
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
19
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
20
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लीटर शुद्ध पाणी गेले व्यर्थ

By admin | Updated: May 19, 2014 23:15 IST

लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठय़ासाठी तयार करण्यात आलेल्या जीवन प्राधीकरणाच्या योजनेला आज साकोलीत गालबोट लागले.

साकोली : लाखनी व साकोली तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठय़ासाठी तयार करण्यात आलेल्या जीवन प्राधीकरणाच्या योजनेला आज साकोलीत गालबोट लागले. रात्री ९ वाजेदरम्यान जीवन प्राधीकरण विभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालयासमोरील वॉल लिकेज झाला व नागझिरा मार्गावर पुराची स्थिती दिसत होती. या लिकेजमुळे लाखो लीटर शुद्ध पाणी वाया गेले.

साकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावासाठी शुद्ध पाण्याची सोय व्हावी यासाठी जीवन प्राधीकरण व हुडकोच्या अर्थसहायाने साकोली येथे जलशुद्धीकरण योजना तयार करण्यात आली. या योजनेला तसे सुरुवातीपासूनच ग्रहण लागले. ऐनकेन प्रकारे ही योजना पूर्ण व्हायला व सुरू व्हायला तारेची कसरतच करावी लागली. ही संपूर्ण योजनाच निम्न चुलबंद प्रकल्पावर आधारित असल्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावरच ही योजना मागील वर्षी सुरू झाली.

जलशुद्धीकरण योजनेसाठी चुलबंद नदीतून पाणी गडकुंभली टेकडीवरील जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणले जाते. यानंतर हे शुद्ध पाणी नागझीरा रोडवर असलेल्या पाण्याच्या टाकीत हे पाणी सोडून पाईप लाईनद्वारे हे शुद्ध पाणी साकोली व लाखनी तालुक्यातील गावांना पाठविले जाते. मात्र या टाकीच्या खालीच असलेल्या वाल लिकेज झाल्यामुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावर वाया गेले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या थेंबाथेंबाला महत्व असताना ऐवढे पाणी वाया गेले तरी अधिकार्‍यांनी रात्रीच त्याची सोय केली नाही. (तालुका प्रतिनिधी)