शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

टीचभर जागेसाठी मायलेकाचा खून 'डबल मर्डर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:18 IST

Amravati : वडीलही गंभीर जखमी; आरोपी शिवारात होता दडला

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सुमारे ३०० फूट खुल्या जागेच्या वादातून एका शेजाऱ्याने चक्क शेजारील मायलेकावर सब्बलने हल्ला चढवत त्यांना ठार केले. सोमवारी दुपारी ४ च्या आसपास मंगलधाम कॉलनीनजीकच्या - बालाजीनगर येथे ती डबल मर्डरची हृद्यद्रावक घटना घडली. सूरज विजयराव देशमुख (३२) व कुंदा विजयराव देशमुख (६५) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत. त्यात विजयराव देशमुख (७०) हे जखमी झाले. देवानंद लोणारे (४५, रा. बालाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. मायलेकाचा खून करून तो घराला कुलूप लावत पसार झाला. त्याला रात्री नऊच्या सुमारास माहुली चोर येथील शिवारातून ताब्यात घेण्यात आले.

विजयराव देशमुख व देवानंद लोणारे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यांच्या दोन घरांच्या मध्ये सुमारे ३०० फूट खुली जागा आहे. त्या लांब व खुल्या पट्टीवजा प्लॉटच्या मागील बाजूस घर बांधले गेल्याने देशमुख व लोणारेंमध्ये त्या जागेच्या कब्ज्यावरून वाद सुरू झाला. लोणारेने अर्ध्यापेक्षा अधिक जागेवर कुंपण टाकले. त्यात झाडे लावली. त्यामुळे तो वाद अधिकच वाढला.

दरम्यान, सोमवारी दुपारी त्याच कारणावरून देवानंद लोणारे हा देशमुख यांच्या घरात शिरला. येथील एका मसाला कारखान्यात काम करणाऱ्या सूरज देशमुखशी त्याने वाद घातला. बोलचाल ऐकून सूरजची आई कुंदाबाई घराबाहेर आल्या. त्या मध्यस्थी करत असतानाच आरोपी देवानंदने त्या मायलेकांवर सब्बलने हल्ला केला. त्यात त्या मायलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाचवा, धावा असा आवाज ऐकून विजयराव घराबाहेर आले. त्यांच्यावर देखील त्याने सब्बलचा वार केला. मात्र, काही शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांचा जीव वाचविला. आरोपी अन्य शेजाऱ्यांच्या मागे देखील सब्बल घेऊन धावला. घटनेवेळी सूरजचा मोठा भाऊ खासगी नोकरीला गेला होता.

आरोपी यवतमाळच्या दिशेने, पोलिस होते मागावर• आरोपी देवानंद लोणारे (४५) हा शेजारील मायलेकाचा निघृण खून करत घराला कुलूप लावत पळून गेला, पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याचे घराच्या प्रवेशद्वाराला कुलूप आढळले. पोलिसांनी प्रवेशद्वारावरून आत चढत आरोपीने घरात सोडलेला सब्बल जप्त केला. तो यवतमाळच्या दिशेने पळाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. तो इंटरनेटचे, टीव्ही कनेक्शनचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेवेळी त्याची पत्नी व मुले घरी होते की कसे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAmravatiअमरावती