अमरावतीत मेफेड्रोन प्रकरणाचे गांभीर्य वाढले; ७.५ कोटींच्या एमडीसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:53 IST2026-02-03T12:51:30+5:302026-02-03T12:53:13+5:30

Amravati : आरोपींमध्ये अमरावतीच्या सधन कुटुंबातील तरुणांचा समावेश; तीन दिवसांचा एमसीआर

Mephedrone case in Amravati escalates; Four arrested with MD worth Rs 7.5 crore | अमरावतीत मेफेड्रोन प्रकरणाचे गांभीर्य वाढले; ७.५ कोटींच्या एमडीसह चौघांना अटक

Mephedrone case in Amravati escalates; Four arrested with MD worth Rs 7.5 crore

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
अहमदाबाद येथील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) च्या पथकाने रविवारी (दि. १) दुपारी नवसारी चांगापूर रिंगरोडवर धडक कारवाई करत सुमारे ७.५ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर, आता या रॅकेटमधील आरोपींची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आरोपी केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसून शहर व जिल्ह्यातील सधन कुटुंबांतील तरुण असल्याचे तपासात समोर आले आहे. सोमवारी (दि. २) आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

फैजल खान अन्सार खान (२२, रा. गुलिस्ता नगर, अमरावती), आवेज अहमद आरिफ अहमद (२५, रा. चांदूरबाजार), मुस्तकीम खान अब्दुल ताहीर खान (२९, रा. चांदूरबाजार) व शेख परवेज शेख नासिर (३२, रा. चांदणी चौक, हाथीपुरा, 33 अमरावती) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या चौघांनाही रविवारी रात्री वैद्यकीय तपासणीनंतर सोमवारी दुपारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एल. सराफ यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. चारही आरोपींकडून ४ किलो ९०२ ग्रॅम एमडी, ४ ग्रॅम गांजा, कार जप्त करण्यात आली. नवसारी चांगापूरस्थित व्हीआरएल ढाब्याजवळ १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

घटनास्थळाहून तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर डीआरआयने गुलिस्तानगर येथून फैजल खान याला ताब्यात घेतले. याप्रकरणात अद्यापही एफआयआर दाखल झालेला नाही किंवा स्थानिक पोलिसांनादेखील माहिती देण्यात आली नाही. ५ किलो एमडीचा साठा आरोपींच्या कारमधून जप्त करण्यात आला. आरोपींकडून जप्त सुमारे ५ किलो एमडी ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ७.५ कोटी रुपये असल्याचे डीआरआयच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले.

संशयाची सुई आता बड्या माशांकडे

  • ही केवळ एक छोटी जप्ती नसून अमरावतीत एमडी ड्रग्जचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. कारंजा घाडगे येथील प्रकरणाशी या प्रकरणाचा काहीही संबंध नसला, तरी अमरावती शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडणे हे धक्कादायक आहे.
  • अटक आरोपींच्या वतीने अॅड. मूर्तिजा आझाद यांनी बाजू मांडली, तर २ डीआरआयच्या वतीने अॅड. कुणाल नालमवार यांनी युक्तिवाद केला.

 

ड्रग्स नेटवर्क उधळणार

डीआरआयच्या पथकाने रविवार (दि. १ पासून नवसारी येथील जीएसटी भवनालाच तपासाचे मुख्य केंद्र बनवले आहे. याच ठिकाणाहून प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. या तरुणांचे ड्रग्ज नेटवर्क नेमके कुठे आणि कुणाशी जोडलेले आहे, एवढा मोठा साठा त्यांनी नेमका कुठून आणला आणि या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड कोण, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान डीआरआयसमोर आहे. तपास याच दिशेने पुढे सरकत आहे.
 

Web Title : अमरावती में मेफेड्रोन मामला गहराया: 7.5 करोड़ रुपये की एमडी के साथ चार गिरफ्तार

Web Summary : अमरावती में मेफेड्रोन का मामला गहरा गया है क्योंकि 7.5 करोड़ रुपये की एमडी के साथ चार लोगों को गिरफ्तार किया गया है, जिनमें समृद्ध पृष्ठभूमि के लोग भी शामिल हैं। जांच का उद्देश्य ड्रग नेटवर्क की जड़ों और मास्टरमाइंड का पता लगाना है, अधिकारियों का ध्यान कनेक्शन और ड्रग्स के स्रोत का पता लगाने पर है।

Web Title : Amravati Mephedrone Case Deepens: Four Arrested with ₹7.5 Crore MD

Web Summary : Amravati's mephedrone case intensifies as four individuals, including those from affluent backgrounds, were arrested with ₹7.5 crore worth of MD. The investigation aims to uncover the drug network's roots and mastermind, with authorities focusing on tracing connections and the source of the drugs.