शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावामध्ये खबऱ्यांची फौज, वाघ शिकार रोखण्यासाठी 'अलर्ट'

By गणेश वासनिक | Published: March 03, 2023 5:03 PM

मार्च ते जून या दरम्यान वाघ शिकारीच्या घटनांमध्ये होते वाढ, गावात अनोळखी दिसल्यास तात्काळ कळविण्याच्या सूचना

अमरावती : उन्हाळ्यात तृष्णा भागविण्यासाठी वाघ दरदिवशी १५ ते २० किमी अंतरचा प्रवास करतो. नेमकी हीच बाब हेरून तस्कर नैसर्गिक वा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये युरिया अथवा विषप्रयोगाद्वारे वाघांची शिकार करतात. त्यामुळे आता वन्यजीव विभागाने व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये खबऱ्यांची मोठी फौज उभारली असून, गावात कोणीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास ‘अलर्ट’ करण्याचा सूचना दिल्या आहेत.

वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या शिकारीसाठी तस्करांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात, असा वन्यजीव विभागाचा आतापर्यंतचा निष्कर्ष आहे. दरवर्षी मार्च ते जून या चार महिन्यांत शिकारी व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावात स्थानिकांना हाताशी घेऊन वाघांसंदर्भात रेकी करतात. स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळविल्यानंतर वाघांची शिकारी केली जाते.

मात्र, वन्यजीव विभागाने यावर्षी व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांना लक्ष्य केले आहे. खबऱ्यांची फौज निर्माण केली असून, गावात कोणी अनोळखी वा परप्रांतीय व्यक्ती दृष्टीस पडल्यास अशांची माहिती वनविभागाला देण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. वाघांची रेकी वा शिकार करण्याच्या मनसुब्याने आलेली व्यक्ती वनविभागाने जेरबंद केल्यास या मोबदल्यात संबंधित खबऱ्यांना योग्य बक्षीस देण्याचे वन्यजीव विभागाचे प्रयोजन आहे. यासंदर्भात वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

पाणवठ्यावर लागणार ट्रॅप कॅमरे

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव- नागझिरा, बोर अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गक वा कृत्रिम पाणवठ्यांच्या परिसरात वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे. पाणवठ्यांवर विषप्रयोग किवा युरिया मिश्रित करून वाघांच्या शिकारीचा डाव ट्रॅप कॅमेऱ्यातून उघडकीस आणता येणार आहे. त्याअनुषंगाने पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. यंदा नव्याने २५०० पाणवठे तयार करण्यात आले आहे.‘त्या’ गावातृून आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पानजीकच्या बहुतांश गावात आदिवासींचे वास्तव्य आहे. मात्र, उन्हाळा सुरू होताच आदिवासी कुटुंब हे रोजगारासाठी स्थलांतरित होतात. आदिवासी हे जूनपर्यंत स्थलांतरित असतात. नेमक्या याच काळात तस्करांकडून वाघांच्या शिकारीचे प्लॅन तयार केले जातात. वाघांची रेकी, वाघांचे भ्रमणमार्ग, पाणवठ्यांवर ये-जा आदी माहिती स्थानिकांकडून तस्कर मिळवितात. त्यामुळे वन्यजीव विभागाने स्थानिकांना विश्वासात घेतले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागMelghatमेळघाटTigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पNavegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य