नगरसेवकाच्या आत्मदहन इशाऱ्यानंतर सभा गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:31+5:30
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतरची बोलावलेली ही पहिलीच सर्वसाधारण सभा. विषय पत्रिकेवरील प्रस्तावांसह प्रभागातील समस्येवर चर्चा करण्याकरिता नगरसेवकही सभागृहात पोहचलेत. दरम्यान, भाजप नगरसेवक विवेक सोनपरोते या सभेवर आक्षेप घेतला. सभेची नोटीस सभेच्या सात दिवस आधी मिळाली नाही.

नगरसेवकाच्या आत्मदहन इशाऱ्यानंतर सभा गुंडाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : भाजपा नगरसेवकाने दिलेल्या आत्मदहनाच्या धमकीमुळे अचलपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांना तहकूब करावी लागली. शनिवार, ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता नगराध्यक्षा सुनीता फिसके यांनी ही सर्वसाधारण सभा बोलावली होती. सभेत १४ प्रस्तावांवर चर्चेअंती निर्णय घ्यायचा होता. या सभेची सूचना नगरसेवकांना दिली गेली.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतरची बोलावलेली ही पहिलीच सर्वसाधारण सभा. विषय पत्रिकेवरील प्रस्तावांसह प्रभागातील समस्येवर चर्चा करण्याकरिता नगरसेवकही सभागृहात पोहचलेत. दरम्यान, भाजप नगरसेवक विवेक सोनपरोते या सभेवर आक्षेप घेतला. सभेची नोटीस सभेच्या सात दिवस आधी मिळाली नाही. नोटीससोबत टिपणीसुद्धा दिल्या गेली नाही. यामुळे ही सभा स्थगित करण्यात यावी. सभा नव्याने बोलाविल्या जावी. तसे न केल्यास आत्मदहन करेल, असा लिखित इशारा नगरपालिका प्रशासनाकडे त्यांनी सादर केला. नगरसेवक सोनपरोते यांनी दिलेल्या निवेदन वजा इशाºयावर मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी नगराध्यक्षा सुनीता फिसके यांचे समवेत चर्चा केली. चर्चेनंतर त्या सभागृहात दाखल होत सभेस सुरूवात केली. यात नगरसेवक प्रवीण पाटील आणि ल. ज. दीक्षित यांनी नगरसेवक सोनपरोते यांच्या निवेदनाविषयी मुख्याधिकाऱ्यांना माहिती विचारली. सोनपरोते यांनी नोटीस वेळेवर न मिळाल्यामुळे आत्मदहनाचा इशारा दिल्याची माहिती मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी सभागृहाला दिली. मुख्याधिकाºयांच्या निवेदनानंतर नगराध्यक्षांनी कोरमअभावी सभा तहकूब झाल्याची घोषणा केली.
पालिका प्रशासनाचे नमते
सभेच्या कोरमकरिता आवश्यक नगरसेवक उपस्थित होते. आत्मदहनाच्या इशाºयामुळे सभा तहकूब केल्यास नगरपालिकेची नाचक्की होणार होती. यात उपलब्ध परिस्थितीत नगराध्यक्षांनी ही सभा कोरमअभावी स्थगित करीत असल्याचे स्पष्ट केले. तहकूब करण्यात आलेली ही सर्वसाधारण सभा विषयपत्रिकेवरील त्याच १४ प्रस्तावांसह सात दिवसांनंतर घेतली जाईल. तशी मागणीही नगरसेवकांनी केली आहे. न. पा. प्रशासनाने त्यास दुजोरा दिला आहे. नगरसेवकाच्या आत्मदहन इशाºयापुढे सर्वसाधारण सभा तहकूब होण्याची अचलपूर पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे. सभेची नोटीस वेळेच्या आत न मिळाल्यामुळे आत्मदहनाचा इशारा देणारे ते पहिलेच नगरसेवक ठरले.