शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी काठ तुटलेल्या पुलावरुन रुग्णवाहिका नेली, गर्भवतीचे प्राण वाचवले; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 19:57 IST

आरोग्य यंत्रणेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक

- पंकज लायदेधारणी : रुद्रावतार धारण केलेल्या सिपना नदीवरील काठ तुटलेल्या पुलावर पुराच्या पाण्यातून रुग्णवाहिका काढून गर्भवतीला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात आले. मात्र या महिलेने मृत बालकाला जन्म दिला. तथापि, तिची प्रकृती सुधारत आहे. या धाडसाबद्दल बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय चमूचे कौतुक होत आहे. प्राप्त माहितीनुसार, पाटिया गावातील जमुना उमेश मावस्कर (२४) या नऊ महिन्यांच्या गर्भवतीला सोमवारी सकाळी ११ वाजता प्रसूतिकळा सुरू झाल्या. तिची प्रकृती  चिंताजनक झाली होती. तेथील आशाने बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून माहिती दिली. परंतु संततधार, पावसामुळे सिपना नदीच्या पुराने दिया गावाजवळील दिया-बैरागड व उतावली-पाटिया मार्गावरील दोन्ही वाहतुकीचे पूल खचले व त्यावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी सायंकाळी पाचपर्यंत वाहत होते. त्यामुळे जमुनाला उपचाराकरिता धारणीला आणणे कठीणच होते. आशाने गावातील ऑटोरिक्षा भाड्याने घेऊन निरगुडी मार्गे चटवाबोडपर्यंत तिला पोहोचवले व तिकडून बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चटवाबोड गावापर्यंत पोहोचली. बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रणित पाखरे यांनी तिच्यावर उपचार केले. तरीसुद्धा तिची प्रकृती चिंताजनकच होती. त्यामुळे रात्री ८ वाजता तिला धारणीला हलवण्याच्या हालचाली डॉक्टरांनी सुरू केल्या. 

वैद्यकीय चमूचे अचाट धाडसबैरागड येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सायंकाळी धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हकिकत सांगितली. सिपना नदीच्या पुलापलीकडे रुग्नवाहिकेने गर्भवतीला आणा, असे निर्देश मिळाले. सदर महिला व डॉक्टरांची चमू रुग्णवाहिकेने बैरागडवरून दिया गावाजवळ असलेल्या पुलाच्या अलीकडे येऊन थांबले. धारणीत असलेले डॉ. नीलेश भालतिलक, डॉ. राखी बरवट, डॉ. जयश्री नवलाखे आणि रुग्णवाहिका चालक मनीष चौरे व सचिन जवरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर माहिती दिली. दिया येथील पुलाच्या एका बाजूला दगड वगैरे टाकून चिंचोळ्या जागेतून रुग्णवाहिका पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून पलीकडे नेली. तेथेसुद्धा पूल खचलेलाच होता. तिकडून आलेल्या रुग्णवाहिकेतून उतरवून जमुनाला या रुग्णवाहिकेत टाकले आणि पुन्हा तीच तारेवरची कसरत करत वाहत्या पाण्यातून रुग्णवाहिका काढली. 

मृत अर्भकाला दिला जन्मधारणी उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलेल्या जमुनावर तेथे कार्यरत वैद्यकीय चमू डॉ. अमोल डवंगे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नालट, डॉ. ठाकरे परिचारिका प्रज्ञा इंगोले यांनी तात्काळ  उपचार सुरू केले. तिने मृत अर्भकाला जन्म दिला. तथापि, जमुनाची प्रकृती सुधारत आहे. 

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला