शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

अमरावतीत मेडिकल काॅलेज होणारच, महाविकास आघाडीची पत्रपरिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 9:45 PM

Amravati News : अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच ही काळ्या दगडावरील रेघ आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अमरावती - अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच ही काळ्या दगडावरील रेघ आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सत्ता असताना वैद्यकीय महाविद्यालय आणणे तर दूर; परंतु त्यासंबंधीचा निर्णयही न घेऊ शकलेली भाजपक्षाची काही स्थानिक मंडळी अमरावतीकरांमध्ये सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमची सत्ता नसताना या मुद्यावर आम्ही कधी बोललो नाही. परंतु, भाजपची मंडळी विनाकारण सतत संभ्रम निर्माण करीत असतील, तर महाविकास आघडीनेही वास्तववादी भूमिका मांडायला हवी, हा या पत्रपरिषदेच्या आयोजनामागचा हेतू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पत्रपरिषदेला महाआघाडीच्या नेत्यांची जंबो उपस्थिती होती. एकवाक्यताही होती. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, अनंत गुढे, विलास इंगोले, सुनील वऱ्हाडे, राजेंद्र महल्ले, बबलू शेखावत, किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, प्रवीण हरमकर, सुनील खराटे, राजेश वानखेडे, प्रशांत डवरे, नीलेश शर्मा, प्रमोद महल्ले उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर चारच महिन्यांत अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता मिळाली. प्रवेशासाठीची प्रक्रिया २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती खोडके यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या अनुषंगाने डाॅ. पद्माकर सोमवंशी, डाॅ. अनिल रोहणकर आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा अनुभव असलेले जळगावचे एक डाॅक्टर अशी संयुक्त बैठक तीन वेळा आम्ही घेतली. आवश्यक ती जागाही उपलब्ध आहे. वर्ष-दोन वर्षाच्या कालावधीत मेडिकल काॅलेज कार्यान्वित होईल, अशी माहिती, खोडके यांनी दिली.

फडणवीसांच्या जवळचे, तरीही काॅलेज नाही

भाजपचे अनिल बोंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. प्रवीण पोटे नामदार आणि सुनिल देशमुख हेदेखील आमदार होतेच. वैद्यकीय महाविद्यालय आणण्याची इच्छाशक्ती असती, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना महाविद्यालय मंजूर करवून घेता आले असते, अशी आठवण संजय खोडके आणि अनंत गुढे यांनी करवून दिली. यापूर्वीच्या सरकारात वैद्यकीय महाविद्यालयाच्या बैठकीला प्रवीण पोटे, अनिल बोंडे, सुनील देशमुख यांनी पाठ फिरविली होती. पोटे हे त्यावेळी पालकमंत्री होते, अशी माहिती गुढे यांनी दिली.संतुलन बिघडू देऊ नये, सुनील देशमुखांवर निशाणाआम्ही तीनवेळा हरलो. सुलभा खोडके दोन वेळा आणि मी एक वेळा. परंतु, आम्ही संतुलन बिघडू दिले नाही. हरल्यावर संतुलन कायम राखता यायला हवे, असे वक्तव्य संजय खोडके यांनी केले. अलीकडेच सुनिल देशमुख यांनी ‘अपना भिडू..’ या आशयाचे चिमटा काढणारे वक्तव्य केले होते. तो धागा पकडून खोडके यांनी सुनील देशमुख यांच्यावर निशाणा साधला. पत्रकारांनी हजार प्रश्न उपस्थित केल्यावर या मुद्यावर स्वतंत्र पत्रपरिषद घेऊ, असे खोडके यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयEducationशिक्षणhospitalहॉस्पिटलAmravatiअमरावती