शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, कोट्यवधीची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 5:00 AM

एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, महापौर चेतन गावंडे आदींनी घटनास्थळाला भेट देत आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली. पालकमंत्री ठाकूर यांनी शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना कराव्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुने बायपासलगतच्या एमआयडीसी येथील नॅशनल पेस्टिसाईड्स ॲन्ड केमिकल नामक फॅक्टरीला शुक्रवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास शाॅर्ट सर्किटने भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तब्बल २१ तासांच्या प्रयत्नाअंती महापालिका अग्निशमन यंत्रणेने आग आटोक्यात आणली. या आगीच्या विळख्यात मशीनरी, केमिकल, फर्टिलायझर, साहित्य असे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री १० पर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्यात व्यस्त होते. एमआयडीसीत आठ हेक्टर जागेवर नॅशनल पेस्टिसाईड्स ॲन्ड केमिकल फॅक्टरी आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतापासूनच विजेचा कमी-जास्त उच्च दाब सुरू होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. शॉर्टसर्किटने आग लागताच प्लास्टिक साहित्यांनी पेट घेतला. अचानक आगीचा भडका उडताच सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. फॅक्टरीत केमिकलचा मोठा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले. मात्र, अग्निशमन बंब कमी पडल्याने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अचलपूर, बडनेरा, अंजनगाव सुर्जी  येथून अग्निशमन वाहने मागविण्यात आली. ६० पाण्याचे आणि ३५ केमिकल फोमचे बंब वापरून २१ तासांनंतर ही आग आटोक्यात  आल्याचे अग्निशमन विभागाचे प्रभारी अधीक्षक अन्वर खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीएमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, महापौर चेतन गावंडे आदींनी घटनास्थळाला भेट देत आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली. पालकमंत्री ठाकूर यांनी शासकीय इमारतींचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना कराव्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

नुकसानाची माहिती घेण्यास प्रारंभअग्निशमन यंत्रणेकडून या भीषण आगीची माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्रपणे फाॅर्म भरून घेण्यात येत आहे. एकूणच आगीच्या विळख्यात सापडलेले साहित्य, केमिकल, मशीनरी, कच्चा मालाचा साठा आदींची माहिती गोळा करण्यात येत आहे.

 

टॅग्स :fireआगMIDCएमआयडीसी