‘शिवाई’ बसला भीषण आग ! अकोट-दर्यापूर मार्गावरील घटना

By प्रदीप भाकरे | Updated: March 12, 2026 17:27 IST2026-03-12T17:25:32+5:302026-03-12T17:27:28+5:30

Amravati : अकोट-दर्यापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका आज दुपारी चुकला. दर्यापूर डेपोची ‘हिरकणी’ बस बसस्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक पेटल्याने मोठी खळबळ उडाली.

Massive fire in 'Shivai' bus! Incident on Akot-Daryapur route | ‘शिवाई’ बसला भीषण आग ! अकोट-दर्यापूर मार्गावरील घटना

Massive fire in 'Shivai' bus! Incident on Akot-Daryapur route

दर्यापूर (अमरावती) : अकोट-दर्यापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका आज दुपारी चुकला. दर्यापूर डेपोची ‘हिरकणी’ बस बसस्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक पेटल्याने मोठी खळबळ उडाली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. दर्यापूर डेपोची हिरकणी बस (क्रमांक एमएच ०९ इएम २२६०) ही गुरुवारी दुपारी परतवाडा येथून दर्यापूरच्या दिशेने येत होती. दुपारी साधारण २:३० च्या सुमारास बस दर्यापूर बसस्थानकाजवळील रेल्वे गेटपाशी आली असता, बसमधून अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता बसने पेट घेतला.

चालत्या बसला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर नगर परिषदेचा अग्निशमन बंब आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, आग भीषण असली तरी सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भरदिवसा गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. बसला आग नेमकी कशामुळे लागली, शॉर्ट सर्किट की अन्य काही तांत्रिक बिघाडाने, याचा तपास सध्या पोलीस आणि परिवहन विभागाकडून केला जात आहे.

Web Title: Massive fire in 'Shivai' bus! Incident on Akot-Daryapur route