पोहरा जंगलात भीषण आग; तीन वाहने खाक; २० ब्लोअर मशीनने नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:28 IST2026-03-30T20:27:00+5:302026-03-30T20:28:08+5:30

Amravati : वडाळी आणि चांदूर वनपरिक्षेत्रातील जंगलात वणवा पेटण्याचे सत्र सुरू झाले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बीटमध्ये शनिवारी दुपारी वणव्याने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाहता पाहता नजीकचे परसोडा बीटदेखील कवेत घेतले.

Massive fire breaks out in Pohra forest; Three vehicles gutted; 20 blower machines used to control it | पोहरा जंगलात भीषण आग; तीन वाहने खाक; २० ब्लोअर मशीनने नियंत्रण

Massive fire breaks out in Pohra forest; Three vehicles gutted; 20 blower machines used to control it

लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी:
वडाळी आणि चांदूर वनपरिक्षेत्रातील जंगलात वणवा पेटण्याचे सत्र सुरू झाले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत पोहरा वर्तुळातील इंदला बीटमध्ये शनिवारी दुपारी वणव्याने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाहता पाहता नजीकचे परसोडा बीटदेखील कवेत घेतले. या आगीत अंदाजे १० हेक्टर जंगलच जळाले तसेच तीन दुचाकींची राखरांगोळी झाली. तब्बल २० ब्लोअर मशीन आग विझविण्यासाठी वापरल्या.

आगीचा राखीव रोपवनालादेखील फटका बसला. जंगलात आगीचा कहर सुरू असल्याची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी (दक्षता) कमलेश पाटील व वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या भीषण आगीमुळे आसमंतात दूरपर्यंत धूर पसरला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी मोर्शी, चिरोडी, माळेगाव, वडाळी, पोहरा येथील वनविभागाचे पथक मदतीसाठी घटनास्थळी धावून आले होते. आग विझविण्यासाठी तब्बल २० ब्लोअर मशीन चालविल्या होत्या. वन कर्मचारीदेखील जिवापाड प्रयत्न करीत होते. रात्री नऊच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविता आले. तोपर्यंत अमूल्य वनसंपदेची राखरांगोळी झाली.

चार वनपरिक्षेत्रातील पथक घटनास्थळी दाखल

विभागीय वनअधिकारी (दक्षता) कमलेश पाटील, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहरा वनपाल होमकांत सोरते, वडाळी वनपाल बापूराव खैरकर, माळेगाव वनपाल नंदकिशोर ठाकरे, बीट वनरक्षक अशोक सोनोने, हेमंत पांगरे, सुमित जगदाळे, मनीषा सोळंके, रेश्मा बोंबले, आकाश सारडा, दिनेश धारपवार, वनमजूर, आगरक्षक, वाहनचालक यांना आग विझविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. त्यांच्या मदतीला मोर्शी, चिरोडी, माळेगाव, वडाळी या वनविभागाच्या पथकालादेखील मदतीसाठी बोलावण्यात आले होते.

तीन वाहनांची राखरांगोळी

वणव्यात वनरक्षक मनीषा सोळंके, वनरक्षक रेश्मा बोंबले, परसोडा येथील खासगी आगरक्षक रामसिंह राठोड यांच्या तीन दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. पोहरा वनविभागात अशी घटना पहिल्यांदाच घडली. जंगलात स्वतःच्या दुचाकीने आलेले हे तिघे उशिरा रात्री परतणार तेव्हा त्यांना हे निदर्शनास आले. सोळंके व बोंबले यांच्या नव्याकोऱ्या दुचाकीसोबत कागदपत्रेदेखील जळून खाक झाली आहेत.


 

Web Title : पोहरा जंगल में भीषण आग; तीन वाहन खाक

Web Summary : पोहरा जंगल, वडाली और चांदुर में भीषण आग लग गई, जिससे दस हेक्टेयर क्षेत्र जल गया और तीन वाहन नष्ट हो गए। दमकल कर्मियों ने बीस ब्लोअर मशीनों का उपयोग करके आग पर काबू पाया, लेकिन वन और संपत्ति का भारी नुकसान हुआ। चार टीमों ने सहायता की।

Web Title : Massive Fire Engulfs Pohara Forest; Three Vehicles Destroyed

Web Summary : A severe fire in Pohara forest, Wadali and Chandur, consumed ten hectares and destroyed three vehicles. Firefighters battled the blaze using twenty blower machines, eventually gaining control after extensive damage to the forest and property. Four teams assisted.