विभत्स! मद्य पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल; दोघांविरोधात गुन्हा

By प्रदीप भाकरे | Published: December 13, 2022 05:59 PM2022-12-13T17:59:55+5:302022-12-13T18:02:21+5:30

१८ दिवसांनी दर्यापुरात गुन्हा दाखल

man sexually abused 19 year old friend by drinking alcohol, makes video; crime against two | विभत्स! मद्य पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल; दोघांविरोधात गुन्हा

विभत्स! मद्य पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल; दोघांविरोधात गुन्हा

googlenewsNext

दर्यापूर (अमरावती) : एका २७ वर्षीय वासनांध तरूणाने १९ वर्षीय तरूण मित्राला दारू पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना स्थानिक बाभळी परिसरात घडली. तेथे उपस्थित तिसऱ्याने त्या अनैसर्गिक शरीरसंबंधाचे छायाचित्रण केले. कळस म्हणजे तो व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल देखील करण्यात आला. त्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत दर्यापूर पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणाच्या घरी बाभळी येथे २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली होती.

पोलीस तक्रारीनुसार, अमोल इंगळे (२७) व सनी हिरपूरकर (२२, दोघेही रा. बाभळी) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरूद्ध भादंविचे कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार), ३४ व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सायंकाळी दोघांनाही अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी सनी हिरपूरकर याने फिर्यादी युवकाला घरी बोलावून त्याला दारू पाजली. त्यानंतर आरोपी अमोल इंगळे याने फिर्यादीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

सनी हिरपूरकर याने त्या अत्याचाराचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानेच ते काही मित्रांच्या व्हॉट्सॲपवर शेअर केले. अन् पाहता पाहता शेकडो लोकांकडे तो व्हिडिओ फॉरवर्ड झाला. माध्यमांवर प्रसारित केले. त्या व्हिडिओची शहरात सर्वत्र चर्चा होत असताना पोलिसांनी घटनेची दखल घेतली. फिर्यादीला बोलावून घेतले. बलात्काराच्या अनेक घटना होत असताना मित्रानेच मित्रावर केलेल्या अत्याचाराच्या या धक्कादायक घटनेची चर्चा संपुर्ण दर्यापुरात होत आहे.

१९ वर्षीय पिडित तरूणाच्या तक्रारीवरून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करुन दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. एकाने अत्याचार केला. तर दुसऱ्याने त्याचे मोबाईलमध्ये शुटिंग करत ते व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर केले.

विनायक लंबे, प्रभारी ठाणेदार, दर्यापूर

Web Title: man sexually abused 19 year old friend by drinking alcohol, makes video; crime against two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.