रेशनकार्ड काढण्याच्या बहाण्याने बोलावले, जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार
By प्रदीप भाकरे | Updated: June 12, 2023 15:27 IST2023-06-12T15:21:46+5:302023-06-12T15:27:04+5:30
तीन महिन्यानंतर गुन्हा

रेशनकार्ड काढण्याच्या बहाण्याने बोलावले, जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार
अमरावती : रेशन कार्ड काढण्याच्या बहाण्याने कलेक्टर ऑफिसला बोलावून एका महिलेवर जंगलात नेऊन बलात्कार करण्यात आला. १५ मार्च रोजी दुपारी १२.३० नंतर ती घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी शेख इरफान उर्फ सलमान सब्जीवाले वल्द शेख उस्मान (रा. अमरावती) याच्याविरूद्ध ११ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास अपहरण, बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल केला.
येथील एका महिलेने आरोपी शेख इरफानकडे रेशनकार्ड बनविण्यासाठी दिले होते. त्यातून त्यांची ओळख झाली. दरम्यान, १५ मार्च रोजी आरोपीने तिला रेशनकार्डसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले. रेशनकार्ड घेण्यासाठी ती तिच्या मुलासह पोहोचली. त्यावेळी आरोपी तिला तिच्या मुलासह येथून दहा किमी अंतरावरील जंगलात घेऊन गेला. आरोपीने पिडिताच्या मुलाला मोबाईलमध्ये व्हिडीओ लावून दिला. त्याला त्यात गुंतवून ठेवत त्याने पिडितावर जबरदस्ती अतिप्रसंग केला. त्याबाबत वाच्यता केल्यास तिच्या पतिला व मुलाला मारण्याची धमकी दिली.
आरोपीने पिडिताला भावाला धमकावले
आरोपी शेख इरफान हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडिताच्या भावाला मोबाईल कॉल केला. तेरी बहनको मै अपनी औरत मानता हू’ असे तो बरळला. त्यामुळे पीडिताला तिच्या भावाने हा काय प्रकार आहे, अशी विचारणा केली. त्यामुळे १५ मार्च रोजी घडलेला प्रसंग तिने भावासह पतीजवळ देखील कथन केला. त्यांनी तिला धीर देत पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यावरून तिने ११ जून रोजी नागपुरी गेट पोलीस ठाणे गाठले.