शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राचा संप मिटला; आज होणार सुरळीत पाणीपुरवठा

By admin | Updated: December 9, 2015 00:08 IST

महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्यासाठी मंगळवारी हाहाकार माजला.

अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्यासाठी मंगळवारी हाहाकार माजला. मजीप्राने वेळेवर पाणीपुरवठा न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. बुधवारी या असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे असताना उशिरा रात्री संप मिटल्याने ही परिस्थिती निवळली आहे. मंगळवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असतो. त्यामुळे बुधवारी पाण्यासाठी वणवण होणार होती. जिल्ह्याभरात मंगळवारी पाणीपुरवठा झाला नसल्याची माहिती शहरवासियांपर्यंत पोहचल्याने गृहिणींची तगमग वाढली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तालुकास्तरावर काही ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. बहुतांश गावात पाणी पोहोचले नाही. अनेक गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. अनेक गावांमध्ये विहिरी आणि हॅन्डपंपांचा सहारा घ्यावा लागला. मात्र, उशिरा रात्री संप मिटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गावखेड्यातील नागरिकांची पायपीटअमरावती : इतर पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत १५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर या संप वजा आंदोलनाचा मोठा परिणाम झाला. या संपामुळे गावस्तरावर पिण्याचा पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले होते. शहरासह चिखलदरा, दर्यापूर व अंजनगावची १५६ गाव पाणी पुरवठा योजना, अंजनगांवची ७९ गाव पाणी पुरवठा योजना, अमरावती, भातकुली, अचलपूर तसेच चांदूरबाजारची १०५ गाव पाणीपुरवठा योजना मजीप्रा मार्फत संचालित करण्यात येते.