शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता नसलेल्या राज्यातील ११ हजार ७०० कर्मचा-यांची नोकरी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 17:13 IST

राज्यात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावणा -या ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांची नोकरी धोक्यात आली आहे. त्याअनुषंगाने कर्मचा-यांची जात वैधता प्रमाणपत्र तपासणी मोहीम सुरू झाली असून ‘व्हॅलिडिटी’ नसल्यास नोकरीतून कमी करण्याचे निर्देश प्रधान मुख्य सचिवांनी सर्वच विभागप्रमुखांना दिले आहेत. 

- गणेश वासनिक 

अमरावती - राज्यात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावणा -या ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांची नोकरी धोक्यात आली आहे. त्याअनुषंगाने कर्मचा-यांची जात वैधता प्रमाणपत्र तपासणी मोहीम सुरू झाली असून ‘व्हॅलिडिटी’ नसल्यास नोकरीतून कमी करण्याचे निर्देश प्रधान मुख्य सचिवांनी सर्वच विभागप्रमुखांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्रमांक ८९२८/२०१५ (चेअरमन अ‍ॅन्ड मॅनेजिंग डायरेक्टर, एफसीआय आणि इतर विरुद्ध जगदीश बाळाराम बहिरा व इतर) प्रकरणी ६ जुलै २०१७ रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अथवा इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या आधारे शासन सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर त्यांच्या जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तिंना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे प्रधान मुख्य सचिव सुमित मलिक यांनी २० जानेवारी २०१८ रोजी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेतली. अनुसूचित जमातीप्रमाणेच अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग यांनी जात प्रमाणपत्राच्या आधारे शासन सेवेत रूजू होताना अधिकारी, कर्मचारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यानुसार अशा अधिकारी, कर्मचाºयांची माहिती तसेच अवैध ठरलेल्या कर्मचाºयांपैकी किती जणांना सेवेतून कमी करण्यात आले, याचा लेखाजोखा मुख्य सचिव सुमित मलिक यांनी तपासला. मात्र, जात चोरून वर्षांनुवर्षे नोकरी बळाकावणाºया अधिकारी, कर्मचाºयांना वरिष्ठांकडून अभय मिळत असल्याचे वास्तव मुख्य सचिव मलिक यांच्या लक्षात आले. राज्यात ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांकडे जात ‘व्हॅलिडिटी’ नसतानाही त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई झालेली नाही, हे विशेष.

जात चोरीप्रकरणी अचूक माहिती पाठवाज्या अधिकारी, कर्मचाºयांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशांची विवरणपत्रात अचूक माहिती पाठविण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टि.वा. करपते यांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी क्षेत्रीय कार्यालये, महामंडळांसह प्रशासकीय विभागप्रमुखांना कळविले आहे. आठ दिवसांत यासंदर्भात माहिती पाठविण्याचे निर्देश दिले असतानासुद्धा याबाबत कमालीची अनास्था दिसून येत आहे.

- तर प्रधान मुख्य सचिवांविरुद्ध कारवाईराज्यात बोगस जातीच्या आधारे ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचारी नोकरीत कायम आहेत. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. ज्या कर्मचाºयांकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही, अशांना नोकरीतून कमी करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे. या आदेशाचे पालन न केल्यास सर्वोच्च न्यायालय राज्याचे प्राधन मुख्य सचिवांविरुद्ध कारवाई करेल, असे निर्देश आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारी