शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

Maharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:22 AM

कोरकू-गोंड आदिवासींचे प्राबल्य असलेला मेळघाट मतदारसंघ हा एसटी राखीव, तर राजकीय घडामोडींना तात्काळ प्रतिसाद देणारा दर्यापूर मतदारसंघ हा एससीसाठी राखीव आहे.

- गणेश देशमुखअमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात आहेत. त्यातील पाच आमदारांना किमान दोन टर्मचा अनुभव आहे. मुरब्बी राजकारण्यांच्या डावपेचात रंगलेले जिल्ह्यातील राजकारण नवख्यांना किती पालटवता येईल, हे बघणे रंजक ठरणार आहे.कोरकू-गोंड आदिवासींचे प्राबल्य असलेला मेळघाट मतदारसंघ हा एसटी राखीव, तर राजकीय घडामोडींना तात्काळ प्रतिसाद देणारा दर्यापूर मतदारसंघ हा एससीसाठी राखीव आहे. या दोन्ही मतदारसंघांत मर्यादित घडामोडी अपेक्षित असताना यावेळी अनपेक्षितपणे त्या लक्षवेधक ठरल्या. मेळघाटात विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे तिकीट भाजपने कापले. ते रमेश मावस्कर यांना मिळाले; परंतु आशा लावून बसलेले माजी आमदार राजकुमार पटेल नाराज होऊन ऐनवेळी बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून, तर काँग्रेसचे केवलराम काळे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले. दर्यापुरात विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना रिपाइंतून आलेल्या; पण ‘पंजा’वर उभे असलेल्या बळवंत वानखडे यांचे आव्हान आहे.अमरावतीत भाजपच्या सुनील देशमुखांना काँग्रेसच्या सुलभा खोडके यांचे आव्हान आहे. अचलपुरातून अपक्ष आमदार बच्चू कडू हे चौथ्यांदा रिंगणात आहेत. तिवस्यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर विरुद्ध शिवसेनेचे राजेश वानखडे अशी लढत असेल. वरूडमधून मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांना शेतकरी स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयार यांनी आव्हान दिले आहे. माळी समाजाच्या गठ्ठा मतांवर तेथील राजकीय निर्णायकता अवलंबून असेल.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. शेतमालाला भाव.२) नागरी सुविधा. शहरी विकास. महिला सक्षमीकरण.३) काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका हा भाजप-सेनेचा प्रचारातील प्रमुख मुद्दा४) भ्रष्टाचारमुक्त शासन. गतिमान प्रशासन.रंगतदार लढतीमेळघाट मतदारसंघातील लढत अचानक रंगतदार झाली आहे. लढत तिहेरी आहे. महसूल उपायुक्त रमेश मावस्कर हे नोकरी सोडून रिंगणात उतरले. माजी आमदारद्वय केवलराम काळे आणि राजकुमार पटेल यांनीही दंड थोपटले आहेत. निवडणुकीतील रंगत तेथे वाढतच जाणार आहे.धामणगाव मतदारसंघात काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप चौथ्यांदा रिंगणात आहेत. भाजपने फ्रेश चेहरा असलेल्या नितीन धांडे यांचे तिकीट कापून ऐनवेळी आमदार अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप यांना उमेदवारी दिली.बडनेरा मतदारसंघात अपक्ष आमदार रवि राणा यांना शिवसेनेच्या प्रीती संजय बंड यांनी आव्हान दिले आहे. रवि राणा हे आमदार आणि त्यांच्या पत्नी नवनीत या खासदार आहेत. दोघेही अपक्ष. भाजप-सेनेशी जवळीक साधून आघाडीच्या समर्थनाने रिंगणात असलेल्या रवि राणा यांना यावेळी कौशल्य पणाला लावावे लागेल.

टॅग्स :AmravatiअमरावतीBacchu Kaduबच्चू कडूMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019