शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; अल्प कालावधी असल्याने उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या हातात जेमतेम बारा दिवस राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता, मतदारांना उमेदवार कधी भेटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे, मेळघाट मतदारसंघ डोंगरी, दुर्गम आहे.

ठळक मुद्देमतदारसंघात प्रचारादरम्यान लागणार कस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. विविध मतदारसंघांचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, मेळघाट मतदारसंघ हा डोंगरी दुर्गम भागाचा असून, विविध भागांत पसरला आहे. उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. याशिवाय कमी कालावधीमुळे गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांची पंचाईत होऊन बसली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या हातात जेमतेम बारा दिवस राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता, मतदारांना उमेदवार कधी भेटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेष म्हणजे, मेळघाट मतदारसंघ डोंगरी, दुर्गम आहे. काही भागात रस्त्यांची दुरवस्था उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरू शकते. निवडणूक प्रचाराचे वारे वाहू लागले की, अनेक कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येते. सकाळी लवकर उठून कार्यकर्ते पक्ष कार्यालय गाठतात आणि गावोगावी भेटी देतात. दुपारी, संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारतात. परंतु, प्रचारासाठी दिवस थोडे असल्याने जोपर्यंत मतमोजणी होत नाही, तोपर्यंत आपण प्रचारात आहोत, असे सांगितले जात आहे. ७ आॅक्टोबरनंतर प्रचाराच्या कामाला वेग येणार आहे.प्रचाराचा आवाज घूम लागलाविधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष व अन्य उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी ७ आॅक्टोबरची मुदत असली तरी जे उमेदवार माघार घेणार नाहीत, अशा काही उमेदवारांनी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला आहे. लाऊडस्पीकवर संगीताच्या माध्यमातून मतदारांना ते मतांचा जोगवा मागत असल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :amravati-acअमरावती