शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: गांधी आणि पवार कुटुंबांमुळे वंशवाद फोफावला: अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 19:40 IST

Maharashtra Election 2019: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला.

अमरावती: काँग्रेसचे राजकारण गांधी परिवारासमोर जात नाही. शरद पवारांनीही मुलगी, पुतण्या, नातू व आप्तांना राजकीय प्लॅटफॉर्म मिळवून दिला. भाजपमध्ये वंशवाद नाही. मात्र वंशवाद मुळात फोफावला असेल, तर तो केवळ गांधी, पवार कुटुंबामुळेच, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. अमरावतीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मौनीबाबा अशी संभावना करत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. 

शेजारील राष्ट्राच्या हल्ल्याविरुद्ध चकार शब्द न काढणाऱ्या पक्षाला देशाने हद्दपार करून राष्ट्रहित जोपासणाºया नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून राष्ट्रवाद मजबूत केल्याचा दावा शहा यांनी के ला. ३७० कलम हटविल्यास ‘खून की नदिया बहेगी’ अशी धमकी दिली जात होती. मात्र, प्रत्यक्षात रक्ताचा एक थेंब न पडता ते कलम हटविल्याचे शहा म्हणाले. महाराष्ट्रातील तत्कालीन मंत्र्याने ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. अवघे नऊ हजार कोटी रुपये खर्च करून देवेंद्र फडवणीस सरकारने पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली.

मेळघाटात राहणाऱ्या आदिवासींसह सर्व समाजाचे हित जोपासण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र व राज्य सरकारने समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन समान न्याय दिल्याचेही ते म्हणाले. १५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करीत मोदी सरकारने सहा वर्षांच्या काळात शेवटच्या घटकांपर्यंत योजना व त्यांचा लाभ पोहोचविल्याचा दावा केला. मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तथा भाजप-सेना युतीचे उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाamravati-acअमरावती