शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

लोटांगण, लिंबूचे काप अन् पशुंचे बळी

By admin | Updated: May 4, 2017 00:13 IST

सातपुड्याच्या पर्वतराजींमध्ये वसलेल्या विदर्भाच्या नंदनवनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ....

‘नवसाच्या यात्रेत’ अंधश्रद्धेचा कहर : देवी पॉइंटवर आदिवासींची गर्दी, विज्ञानयुगातील धक्कादायक प्रकारचिखलदरा : सातपुड्याच्या पर्वतराजींमध्ये वसलेल्या विदर्भाच्या नंदनवनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘देवी पॉइंट’वरील जनादेवीची ‘नवसाची यात्रा’ सध्या सुरू असून या हायटेक युगातही शेकडो आदिवासी येथे कोंबड्या, बकऱ्यांचा बळी देऊन नवसपूर्ती करीत असल्याचे क्लेशदायक चित्र आहे. दीड महिनापेक्षा अधिक काळ चालणाऱ्या या यात्रेत मंगळवारी आणि शुक्रवारी पूजा-अर्चा करून प्राण्यांचा बळी दिला जातो. चैत्र महिन्यात ही आदिवासींची पारंपारिक यात्रा सुरू होते. मृगाच्या सरी कोसळेपर्यंत यात्रा सुरू असते. मेळघाटातील धारणी, चिखलदऱ्यासह मध्यप्रदेशातील भैसदेही, खंडवा आगदी परिसरातील आदिवासी, कोरकू लोकांची ही ‘नवसपूर्र्ती’ची पुरातन परंपरा विज्ञानयुगातही कायम आहे, हे विशेष. या यात्रेला येत असलेले विभत्स रूप पाहता काही दिवसांपूर्वी मंदिर व्यवस्थापनासह जिल्ह्याबाहेरील काही जागरूक व समाजसेवी नागरिकांनी या नवसाच्या यात्रेला कायद्याने बंदी घालण्याची मागणी केली असून आदिवासींमध्ये जनजागृतीचा प्रयत्नही केला. मात्र, तो निष्फळ ठरला. अंगात देवी अन् हातात लिंबूनवसाच्या यात्रेत ज्याचा नवस फेडायचा आहे त्यांच्या कुटुंबासह गावातील एखादा सदस्य देखील येतो. यापैकी कुणाच्याही अंगात देवी संचारते. मग, त्या व्यक्तिची देवी समजून पूजा केली जाते. त्या व्यक्तिच्या अंगात संचारलेली ही देवी मग मंदिराच्या पायऱ्यांवरून लोटांगण घालून थेट खाली उतरते. मग, येथील मांत्रिक लिंबू कापून मंत्रोच्चारासह आजारी व्यक्तिच्या अंगावरून उतरवून दोन्ही दिशांना फेकतो. इतकेच नव्हे तर अंगात आलेली ही देवी मंदिरातील देवीसोबत संवादही साधते. अंधश्रद्धेच्या या गर्तेत अनेक सुशिक्षितांचा भरणा देखील दिसून येतो. कापलेला बोकड, कोंबड्याचा प्रसादनवसाची पूजा करताना बोकड, कोंबड्याची पूजा करून त्यांचा बळी दिला जातो. या मुक्या प्राण्यांच्या रक्ताचे काही थेंब प्रसाद म्हणून देवीला वाहिले जातात. मात्र, अलिकडे ही बळीप्रथा व पूजा देवी पॉर्इंटच्या वरील भागात केली जाते. मंदिर परिसरात फक्त पूजेची परवानगी आहे. कापलेल्या पशुंचे मटण शिजवून त्याचे जेवण दिले की नवसाची पूर्तता झाली, असे मानतात. अलिकडे या नवसाच्या यात्रेला मांसाहारी खवय्यांनी पसंती दर्शविल्याने या यात्रेला एखाद्या पार्टीचे रूप आले आहे.कातळातील देवीचे मंदिरहे मंदिर एका विशालकाय कातळामध्ये स्थित आहे. जनादेवीसमोर बोललेला नवस पूर्ण होतोच, अशी आदिवासींची श्रद्धा आहे. हा नवस पूर्ण झाला की कोंबडा, बकरा कापून तो फेडला जातो. कपारीत असलेल्या या मंदिरात शेकडो आदिवासी अंगावर पाण्याचे तुषार झेलत नवसपूर्ती करतात.