शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्सचेंज’ अर्जांची विक्री करून ग्राहकांची लूट

By admin | Updated: November 17, 2016 00:04 IST

पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रका....

आयडीबीआय शाखेतील प्रकार : एटीएममधून ५०० रूपयेच काढण्याची सक्तीअमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रकार बुधवारी शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेत उघडकीस आला. पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही अवधीपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची प्रक्रिया बँकांमध्ये सुरू आहे. नोटांच्या अदलाबदलीसाठी बँकांमार्फत एक अर्ज दिला जातोे. संबंधिताच्या कुठल्याही एका ओळखपत्राची झेरॉक्स प्रत देऊन संबधित बँक जुन्या नोटांच्या बदलात नव्या नोटा ग्राहकांना देते. मात्र, शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेत नोटा बदलण्याकरिता गेलेल्या नागरिकांना मात्र, बँकेद्वारे अर्ज न देता नजीकच्याच एका व्यापारी प्रतिष्ठानात पाठवून तेथून अर्ज घ्यायला सांगितले जाते. ग्राहक त्याठिकाणी गेल्यानंतर तेथे त्यांना दोन रूपये देऊन अर्ज विकत घेण्यास सांगितले जाते. एटीएममधूनही केवळ पाचशे रुपयेच काढण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गोची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यापासून अमरावतीकरांची प्रचंड ताराबंळ उडाली आहे. मागील पाच दिवसांपासून शहरात केवळ नोटांचीच चर्चा सुरु आहे. नोटा बदलविण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे राहणे, एटीएममध्ये पैसे नसणे, आदी समस्यांमध्ये ग्राहक अडकले आहेत. दैनंदिन गरजांसाठी लागणारा पैसा मिळावा, या उद्देशाने बहुंताश नागरिक बँका व एटीएममध्ये जात आहेत. मात्र, बँकामधील रांगा व एटीएममध्ये निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आवश्यक तेवढे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांची बरीचशी कामे अडकून पडली आहेत. शिलांगण मार्गावरील आयडबीआय बँकेत हे चित्र दिसून आले. नागरिकांना पाचशे व हजारांच्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी ग्राहकांना इतर बँकांमध्ये मोफत मिळणारा अर्ज देखील या बँकेत उपलब्ध नव्हता. तो शेजारच्या एका व्यापारी प्रतिष्ठानामार्फत दोन रूपयांना विकत घ्यावा लागत होता. आधीच चिल्लरचा तुटवडा असताना अर्ज घ्यावा तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यातच आयडीबीआयच्या एटीएममधून केवळ पाचशे रुपये काढण्यास परवानगी दिली जात आहे. एटीएममधून एकावेळी दोन हजार रुपये काढण्यास शासनाने परवानगी दिली असताना आयडीबीआयच्या एटीएमवर केवळ पाचशे रुपये काढण्यास सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे शासनाने ठरवून दिलेली रोख सुध्दा नागरिकांना मिळत नाही. बँकांनी नोटा एक्सचेंज करण्यासाठी अर्जाची झेरॉक्स नागरिकांना दिली तर चालेल. मात्र, त्या अर्जाची विक्री होत असेल तर संबंधित शाखेला सूचना देण्यात येईल. - सुनील रामटेके, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक. संबंधित शाखेला अर्जपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित शाखेतून अर्ज घेण्यास नागरिकांना दुसरीकडे पाठविले जात असेल तर हा प्रकार थांबविण्याच्या सूचना देण्यात येतील. - प्रदीप गायकवाड, व्यवस्थापक, आयडीबीआय