शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयसह सहा पोलीस मनोज पांडेच्या शोधात

By admin | Updated: April 5, 2017 00:06 IST

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी मनोज पांडे याच्या शोधार्थ दोन पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली आहे.

विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण : क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीतील सीसीटीव्ही फुटेज जप्तअमरावती : विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी मनोज पांडे याच्या शोधार्थ दोन पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली आहे. सोमवारी रात्री गाडगेनगर पोलिसांनी क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीतील सीसीटीव्ही फुटेज जप्त केली असून त्या फुटेजमध्ये काही आढळून येते का, याबाबत तपासणी सुरू केली आहे. सिंधी कॅम्पस्थित राम लक्ष्मण संकुलातील क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीचे संचालक मनोज पांडे यांच्यावर एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. शिक्षक व विद्यार्थिंच्या संबंधांना काळीमा फासणाऱ्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र, अद्यापपर्यंत मनोज पांडे पोलिसांच्या हाती लागला नाही. गाडगेनगर पोलीस ठाण्यातील दोन पीएसआयसह सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके मनोज पांडेच्या शोधात भटकंती करीत आहे. त्यांनी गुप्त माहितीवरून अकोला येथून मनोज पांडेचा शोध घेतला. मात्र काही मनोज पांडे पोलिसांच्या हाती लागला नाही. सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीची पाहणी केली असता तेथे ६ सीसीटीव्ही कॅमेरे आढळली. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले. मनोज पांडेच्या संपर्कातील पाच जणांचे बयाण पोलिसांनी नोंदविले आहे. मात्र, त्यांनी मनोज पांडेबाबत काही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले.पांडेच्या पत्नीची चौकशीमनोज पांडे पसार झाल्यावर त्याने पत्नीशी संपर्क केला असावा, असा संशय गाडगेनगर पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी राजापेठ परिसरात राहणाऱ्या पांडेच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीकडे चौकशी केली. मात्र, मनोज पांडेने त्यांच्याशी संपर्क केला नसल्याचे पोलिसांना समजले. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीतील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आली असून पोलिसांची दोन पथके मनोज पांडेच्या शोधात आहे. त्याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. मात्र, पांडेने त्यांच्याशी संपर्क केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. - कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर