शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिच्या’ प्रसंगावधानामुळे टळली प्राणहानी

By admin | Updated: January 7, 2016 00:29 IST

नववर्षाच्या स्वागतानंतर लॉनजवळील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत लाखोंचे घरगुती साहित्य जळून खाक झाले.

नववर्षाच्या पहिल्या दिवशीची घटना : शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, लाखोंचे साहित्य भस्मसात अमरावती : नववर्षाच्या स्वागतानंतर लॉनजवळील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत लाखोंचे घरगुती साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे सर्वप्रथम फ्लॅटमध्ये राहणाऱ्या बालिकेच्या लक्षात येताच तिने कुटुंबीयांना सूचना देऊन सर्वाना बाहेर निघण्याचा मार्ग दाखविल्याने प्राणहानी टळली. गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत े६ी लॉन मागील परिसरात जगदंबा अपार्टमेंटमध्ये एकुण सहा प्लॅट असून तेथील तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सुहास कृष्णराव देशमुख यांचे कुटुंबीय राहतात. ३१ डिसेंबरपूर्वी सुहास देशमुख हे चाळीसगाव येथे गेले होते. त्यांच्या घरी पत्नी लक्ष्मी, त्यांची मुलगी स्वरांजली, मुलगा स्मित व वडील कृष्णराव उपस्थित होते. रात्री १२ वाजतानंतर नवर्षास सुरुवात झाल्यानंतर सर्व कुटुंबीय निवांतपणे घरात आपआपल्या ठिकाणी झोपले होते. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अचालक सिलिंगचा एक लाईट गरम होऊन सोफ्यावर पडला व आग लागली. ही बाब स्वरांजलीच्या लक्षात येताच तिने तत्काळ आजोबा, आई व भावाला झोपेतून उठवले. सर्वांना घेऊन जिन्यातील मार्गाने दुसऱ्या माळ्यावर सुखरुप उतरविले. दुसऱ्या माळ्यावर राहणारे धर्माळे यांना उठवून मदत मागितली. धर्माळे यांनी तत्काळ अग्निशमन विभाग व गाडगेनगर पोलिसांना फोनवर माहिती कळविली. काही वेळात अग्निशमन विभागाचे कर्मचारी पाण्याचे बंब घेऊन अर्पाटमेंटमध्ये पोहोचले व त्यांनी पहाटे ३ वाजेपर्यत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे सुहास देशमुख यांच्या घरातील महागडा सोफा, इलेक्ट्रानिक्स वस्तू व फर्निचर असा लाखोंचा माल जळून खाक झाला आहे. सुहास यांच्या मुलीने हिंमत व प्रसंगावधान राखून कुटुंबीयांना घराबाहेर निघण्याचा योग्य मार्ग दाखविल्याने मोठी घटना टळळी आहे. (प्रतिनिधी)