अमरावतीत देशी दारू दुकानाच्या मॅनेजरला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 13:55 IST2023-05-21T13:54:09+5:302023-05-21T13:55:33+5:30
भगत हे काही वर्षांपासून वलगाव येथील देशी दारू दुकानाचे व्यवस्थापक म्हणून काम करतात.

अमरावतीत देशी दारू दुकानाच्या मॅनेजरला लुटले
अमरावती: वलगाव येथील देशी दारू दुकानाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून त्याच्याकडील १.२५ लाख रुपये जबरीने हिसकावण्यात आले. १९ मे रोजी रात्री १०.१० ते १०.३० च्या सुमारास वलगाव येथील राधासिटी भागात ही घटना घडली. याप्रकरण राहुल भगत (४७, रा. राधासिटी क्रमांक १, वलगाव) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी २० मे रोजी पहाटे १.४८ च्या सुमारास तीन अनोळखी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला.
भगत हे काही वर्षांपासून वलगाव येथील देशी दारू दुकानाचे व्यवस्थापक म्हणून काम करतात. १९ मे रोजी रात्री १० च्या सुमारास ते दारू दुकान बंद करून सोबत दिवसभरातील दारूविक्रीतून आलेले १.२५ लाख रुपये घरी घेऊन जात होते. अगदी घराजवळ एका वळणावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. तथा तोंडावर थापडा मारत त्यांच्याकडील १.२५ लाख रुपये घेऊन त्या तिघांनी खारतळेगाव रसत्याने पळ काढला. त्यानंतर उशिरा रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.