शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पशूंची मालकी सिद्ध करण्यासाठी परवाना अनिवार्य

By admin | Updated: December 23, 2016 00:13 IST

वारंवार ताकिद आणि नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा सपाटाच महापालिकेने चालविला आहे.

अमरावती : वारंवार ताकिद आणि नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या पशुपालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा सपाटाच महापालिकेने चालविला आहे. पशुंची मालकी सिद्ध करण्यासाठी आता परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. मोकाट जनावरांमुळे शहरातील अपघात वाढले असून वराहांच्या मुक्त संचारामुळे आरोग्यही धोक्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून पशुपालकांना वारंवार नोटीस आणि समज देण्यात आली. तरीही बहुतांश गाई, बैल आणि वराह रस्त्यावर मोकाट फिरताना आढळून येतात. महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरांवर कारवाई करीत असला तरी त्याला सुद्धा मर्यादा आहेत. आठ महिन्यांत महापालिकेने ९०० पेक्षा अधिक मोकाट जनावरांना बंदिस्त केले, तर त्यांना मालकांकडून साडेतीन लाखांचा दंडही वसूल केला. या कारवाईचा परिणाम संबंधित पशुधारकांवर पाहिजे तसा न झाल्याने महापालिकेने आता थेट फौजदारीचा मार्ग निवडला आहे. शहरातील सर्व गोपालकांसह वराह आणि श्वानासह अन्य पशुपालकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पशू, जनावरांची महापालिकेत नोंदणी करावी, पशुची योग्य ती काळजी न घेता त्यांना मोकाट सोडणे, त्याचा निवारा आणि चारा पाण्याची व्यवस्था न करणे ही क्रुरता असून त्यामुळेच अशांवर फौजदारीची कारवाई केली जाणार आहे. मोकाट जनावरे पकडण्यासाठी असलेल्या पथकासोबतच अनेक पशुपालक मुजोरी करतात. वेळप्रसंगी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या भरारी पथकाने मोकाट पशुंना जप्त केल्यानंतर ज्या कोणत्याही पशुधारकास स्वत:च्या मालकीचा पशु सोडवायचा असल्यास त्यांना त्यांच्या पशुंचा मालकीहक्क सिद्ध करावा लागेल. पशुंची मालकी सिद्ध करण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी किंवा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा नोंदणी केल्याचा दाखला अनिवार्य असेल. अन्यथा पशुपालकांवर फौजदारी गुन्हा असे आहे परवाना शुल्क बैल, वळू, गाय, म्हैस, घोडा या जनावरांची कमाल मर्यादा पाच जनावरांना २५० रुपये, मेंढी, शेळी, वराह या जनावरांची कमाल मर्यादा १० प्रमाणे २५० रुपये, दोन श्वानांच्या परवान्यासाठी २५० रुपये, कमाल मर्यादेपेक्षा अधिक जनावरे असल्यास बैल, वळू, गाय, म्हैस या जनावरांसाठी प्रति जनावर ५० रुपये, शेळी, मेंढी, वराहांसाठी २५ रुपये प्रति जनावर तथा श्वानांसाठी प्रति श्वान १२५ रुपये असे वार्षिक परवाना वजा नोंदणी शुल्क आहे.