उपवनसंरक्षकांच्या बंगल्यातील झाडावर बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:35+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल, सिपना, अकोट या वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित घनदाट जंगलात जंगल सफारी सुरू आहे. यादरम्यान चिखलदरा येथील अप्पर प्लेटो स्थित गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शासकीय निवासस्थानात असलेल्या झाडांवर शुक्रवारी रात्री बिबट्याने ठाण मांडले होते. उपवनसंरक्षक व कर्मचाऱ्यांना तो बिबट दिसला. त्यांनी या घटनेची नोंद घेतली.

Leopard on the tree in the forest ranger's bungalow | उपवनसंरक्षकांच्या बंगल्यातील झाडावर बिबट

उपवनसंरक्षकांच्या बंगल्यातील झाडावर बिबट

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटकांना वाघाचे दर्शन

नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह अतिसंरक्षित  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना आता वाघ आणि बिबट्याचे दर्शनही होऊ लागले आहे. शुक्रवारी रात्री  उपवनसंरक्षकांच्या शासकीय निवासस्थानातील झाडावर बिबट्याने ठाण मांडले. दुसरीकडे ढाकणा जंगल सफारीत पर्यटकांना दर्शन दिले, तर कुकुलदरा परिसरात पर्यटकांना दिवसा वाघाचे दर्शन झाले. 
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल, सिपना, अकोट या वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित घनदाट जंगलात जंगल सफारी सुरू आहे. यादरम्यान चिखलदरा येथील अप्पर प्लेटो स्थित गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शासकीय निवासस्थानात असलेल्या झाडांवर शुक्रवारी रात्री बिबट्याने ठाण मांडले होते. उपवनसंरक्षक व कर्मचाऱ्यांना तो बिबट दिसला. त्यांनी या घटनेची नोंद घेतली.
दुसरीकडे शनिवारी डोलार निसर्ग पर्यटन सफारीदरम्यान अमरावती येथील वन्यजीवप्रेमी पर्यटक आशिष वैभव यांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी दिली. मेळघाटातील वन्यप्राण्यांची विपुलता या घटनांनी पुढे आली आहे.

दोन भागात दिवसाच दिसला वाघ 
चिखलदरा शहर लोअर आणि अपर प्लेटो अशा दोन भागांत वसले आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास स्थानिक नागरिक लोअर प्लेटोकडे येत असताना कुकुलदरा परिसरात वाघ जात असल्याचे दिसले. बघता-बघता तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नागरिकांच्या आवाजाने वाघ तेथून निघून गेला.

Web Title: Leopard on the tree in the forest ranger's bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.