शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

खैरी, दोनोडा, वासनी, वाढोणा शिवारात १० मे पासून या बिबट्याची दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी याबाबत वनाधिकाऱ्यांकडे मौखिक विचारणा केली आहे. वन विभागाने त्या परिसरात गस्त वाढविली आहे. एका ट्रॅक्टरचालकाला तर बिबट मादीसह बछड्याने एकत्रित दर्शन दिल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवनविभागासह पोलिसांत तक्रार : अचलपूर तालुक्यातील सात गावे भयभीत

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोरोनात बिबट्याच्या दहशतीने अचलपूर तालुक्यातील सात गाववासी भयभीत झाले आहेत. दररोज हा बिबट कुणाला ना कुणाला दर्शन देत आहे. दर्शन देत कोरोनात दहशत पसरविणाऱ्या या बिबट्याच्या विरोधात ग्रामस्थांनी वनविभागासह पोलिसांकडे तक्रार केली आहे.खैरी, दोनोडा, वासनी, वाढोणा शिवारात १० मे पासून या बिबट्याची दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी याबाबत वनाधिकाऱ्यांकडे मौखिक विचारणा केली आहे. वन विभागाने त्या परिसरात गस्त वाढविली आहे. एका ट्रॅक्टरचालकाला तर बिबट मादीसह बछड्याने एकत्रित दर्शन दिल्याची माहिती आहे.गस्ती दरम्यान परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत दर्यापूर वर्तुळातील गस्तीवरील पथकाला खैरी दोनोडा शिवारात या बिबट्याच्या पावलांचे ठसे मिळाले आहेत. या पावलांच्या ठशांचे प्लास्टर कास्टही घेण्यात आलेले आहेत.अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात यापूर्वी २५ एप्रिल रोजी लोखंडी ट्रॅपमध्ये एक बिबट अडकला होता. हा बिबट सध्या परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला उपचार घेत आहे.दरम्यान १० मे पासून त्याच खैरी शिवारासह दोनोडा, वासनी, वाढोणा, अचलपूर-रासेगाव मार्गावरील गोपी धाबा, अंजनगाव रोडवरील लोकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. दिसत असलेल्या बिबटाची माहिती वेळोवेळी वनपरिक्षेत्र कार्यालयाला नागरिकांकडून देण्यात आलेली आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या नेतृत्वात दर्यापूर वनपरिक्षेत्राचे वनपाल डी. बी. सोळंके, डी. सी. लोखंडे, राजू काळे यांच्यासह वनरक्षक नितीन अहिरराव, प्रशांत उमक, प्रदीप बाळापुरे, प्रवीण निर्मळ, धुमाळे, एस. जी. बरवट, पवार आणि वनाधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक त्या-त्या भागांत गस्त घालीत आहेत.बिबट्याची दहशत बघता वनविभागाने रात्रीलाही आपली गस्त वाढविली आहे. पण, खैरी दोनोडा शेतशिवार वगळता कुठेही बिबट्याच्या पावलाचे ठसे वनविभागाला आढळून आलेले नाहीत. मागील आठ दिवसांपासून या बिबट्याच्या मागे वनविभागाची गस्त सुरू आहे. गावकरी मात्र बिबट्याच्या दर्शनाने भयभीत झाले आहेत. त्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी ते करीत आहेत.

टॅग्स :forestजंगल