डेंटल कॉलेजसमोर बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:30+5:30

रविवार, १० मे रोजी सायंकाळपासून वादळ, पाऊस होता. काही तास वीज गूल होती. अशातच दंत महाविद्यालयासमोरील रहिवासी संजय मकेश्र्वर यांना घराच्या मागील संरक्षण भिंतीच्या चॅनेल गेटलगत आवाज आला. त्यावेळी वीज होती. अंधार नसल्याने मकेश्र्वर यांनी आपल्या तीनही मुलींना सोबत घेत त्या दिशेने बघितले असताना आवारातच बिबट दडून बसल्याचे दिसून आले. संजय मकेश्र्वर यांनी तत्क्षण मुलींना घरात घेतले. दार लावले.

Leopard sighting in front of the dental college | डेंटल कॉलेजसमोर बिबट्याचे दर्शन

डेंटल कॉलेजसमोर बिबट्याचे दर्शन

ठळक मुद्देवनविभागाला दिली माहिती : घराच्या आवारात दिसून आल्याने काही क्षण उडाली भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संचार ही नित्याचीच बाब असताना आता बिबट्याने नागरी वस्त्यांकडे धूम ठोकली आहे. येथील दंत महाविद्यालयासमोर संजय मकेश्र्वर यांच्या निवासस्थानाच्या आवारात बिबट दिल्याने अनेकांची भंबेरी उडाली. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. बिबट असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.
रविवार, १० मे रोजी सायंकाळपासून वादळ, पाऊस होता. काही तास वीज गूल होती. अशातच दंत महाविद्यालयासमोरील रहिवासी संजय मकेश्र्वर यांना घराच्या मागील संरक्षण भिंतीच्या चॅनेल गेटलगत आवाज आला. त्यावेळी वीज होती. अंधार नसल्याने मकेश्र्वर यांनी आपल्या तीनही मुलींना सोबत घेत त्या दिशेने बघितले असताना आवारातच बिबट दडून बसल्याचे दिसून आले. संजय मकेश्र्वर यांनी तत्क्षण मुलींना घरात घेतले. दार लावले. दाराच्या आवाजाने बिबट्याने संरक्षण भिंतीवरून चॅनेल गेट ओलांडून लांब उडी मारून पोबारा केला. मात्र, काही क्षण मकेश्र्वर कुटुंबीयांची भंबेरी उडाली होती, हे विशेष. दंत महाविद्यालय हा परिसर अमरावती विद्यापीठालगतच असल्यामुळे बिबट शिकारीच्या शोधात बाहेर आला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. घराच्या आवारात दडून बसलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे मोबाइलमध्ये कैद केल्याची माहिती विद्यापीठात शिपाईपदी कार्यरत संजय मकेश्र्वर यांनी दिली.

विद्यापीठ एमबीए विभाग परिसरात तीन बिबट
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एमबीए विभाग परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजतानंतर तीन लहान मोठे बिबट दिसून आल्याची माहिती एरिया आॅफिसर प्रमोद चव्हाण यांनी दिली. दरदिवशी विद्यापीठात रात्रीच्यावेळी सुरक्षेच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मंगळवारी रात्री ११ वाजता दरम्यान एमबीए विभाग परिसरात वेगळा सुंगध आला. लांब उडी मारून नाल्याच्या दिशेने जाताना बिबट दृष्टीस पडला. मोर, रानगवा, माकड, श्वान या भागात मोठ्या संख्येने वावरत असल्यामुळे शिकारीसाठी बिबट्यांचे याच भागात वास्तव्य राहत असल्याचे विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी रवींद्र सयाम यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Leopard sighting in front of the dental college