कुसुमकोट येथे गुराख्यावर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:24 PM2018-11-11T22:24:50+5:302018-11-11T22:25:05+5:30

येथून तीन किमी अंतरावरील कुसुमकोट बु. येथील आदिवासी गुराख्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले.

Leopard attack in Gurukha at Kusumakot | कुसुमकोट येथे गुराख्यावर बिबट्याचा हल्ला

कुसुमकोट येथे गुराख्यावर बिबट्याचा हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : येथून तीन किमी अंतरावरील कुसुमकोट बु. येथील आदिवासी गुराख्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले.
गोमा झिंगू मावस्कर (५२) असे गुराख्याचे नाव आहे. कुसुमकोट शिवारात मधवा नाल्याजवळ बकऱ्या चारत असताना कळपाजवळ अचानक बिबट आला. त्याने गोमावर हल्ला चढविला. शेतात काम करीत असलेल्या पत्नीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आणले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून अमरावतीला पुढील उपचाराकरिता हलविले.
दरम्यान, कुसुमकोट, दहेंडा, कालपी, टिंगºया परिसरातील नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट की तडस?
गोमावर हल्ला करणारा बिबट की तडस, यावर शंका व्यक्त करण्यात आली. मात्र, गोमाने त्यांची बिबट्याशी झटापट झाल्याचे सांगितले.

Web Title: Leopard attack in Gurukha at Kusumakot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.