शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विम्याबद्दल जनजागृतीचा अभाव

By admin | Updated: May 20, 2016 00:19 IST

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे.

विदारक वास्तव : अनेक लाभार्थी वंचित दर्यापूर : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे. परंतु या लाभदायक योजनेबद्दल पुरेशी जनजागृती नसल्याने या योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. या योजनेंतर्गत शासनामार्फत विमा संरक्षण दुप्पट करण्यात आले आहे. परंतु योजनेसंदर्भात संबंधित विभागाने जनजागृतीकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. शहरात योजनेसंदर्भात प्रचार पत्रकांचे पाहिजे त्या प्रमाणात वाटप करण्यात आलेले नाही. तसेच प्रचारासाठी प्रसिध्दी माध्यमांचादेखील पुरेसा वापर झाला नसल्याचे दिसते. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. यावरून शासकीय योजना राबविण्याबाबत अधिकारी किती गंभीर आहेत, हे दिसून येते.अनेकदा शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो. कुटुंबातील कर्ता पुरूषच गेल्याने त्याचे कुटुंब वाऱ्यावर येतात. सातत्याने उदभवणारी दुष्काळी स्थिती, नापिकी आणि त्यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या बाबी लक्षात घेऊन शासनाने या विमा योजनेच्या लाभाची रक्कम दुप्पट केली आहे. पूर्वी अपंगत्व आल्यास अथवा एखादा अवयव निकामी झाल्यास ५० हजारांचे अनुदान मिळत होते. आता ते एक लाखावर पोहोचले आहे. रक्कम दुप्पट केल्यानंतर योजनेला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा शासनाला होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे व सुस्तावलेल्या धोरणामुळे योजनेला पाहिजे तेवढी प्रसिध्दीच मिळालेली नाही. परिणामी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. (प्रतिनिधी)