शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

कोकण, पुणे पावसात अव्वल; मराठवाडा माघारला, धरणांतील जलसाठा ५७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 15:52 IST

- प्रदीप भाकरेअमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याचे उणेपुरे ४० दिवस शिल्लक असताना राज्यातील ३,२६६ प्रकल्पांमध्ये १९ आॅगस्टअखेर केवळ ५७.६० टक्के पाणी साचले आहे.गतवर्षी हेच ...

- प्रदीप भाकरे अमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे आणि कोकणातील प्रकल्पसाठा ७० ते ९० टक्क्यांवर पोहोचला असताना, मराठवाडा मात्र अजूनही तहानला असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याचे उणेपुरे ४० दिवस शिल्लक असताना राज्यातील ३,२६६ प्रकल्पांमध्ये १९ आॅगस्टअखेर केवळ ५७.६० टक्के पाणी साचले आहे.गतवर्षी हेच प्रमाण ५२.२० टक्के असे होते.तूर्तास अमरावती प्रदेशातील ४४५ प्रकल्पांमध्ये ४३.४६ टक्के, कोकण प्रदेशातील १७६ प्रकल्पांमध्ये ९०.१३ टक्के, नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये ३९.३७ टक्के, नाशिक प्रदेशातील ५७१ प्रकल्पांमध्ये ५३.२० टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ७९.१५ टक्के, तर मराठवाड्यातील ९६४ प्रकल्पांमध्ये केवळ २०.८५ टक्के जलसाठा आहे.राज्यातील १४२ मोठ्या प्रकल्पांमध्ये ६५.१० टक्के, २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये ४६.५५ टक्के व २८६६ लघूप्रकल्पांमध्ये अवघा ३२.६७ टक्के जलसाठा आहे. अन्य पाच प्रदेशांच्या तुलनेत मराठवाडा सन २०१६ प्रमाणे दुष्काळाशी झगडत आहे. मराठवाड्यातील ४५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.१६ टक्के, ८१ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.५० टक्के व ८३८ लघू प्रकल्पांमध्ये अवघा १७.५७ टक्के जलसाठा आहे. एकूणच मराठवाडा प्रदेशाची जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. 

मोठ्या प्रकल्पातील जलसाठाकाटेपूर्णा (अकोला)    - ४९.७२वाण (अकोला)    - ६७.००उर्ध्व वर्धा (अमरावती)    - ४६.३५खडकपूर्णा (बुलडाणा)    - ०नळगंगा (बुलडाणा)    - १४.१९अरुणावती (यवतमाळ)    - ८१.६५पूस (यवतमाळ)    - ९९.९८नांद (नागपूर)    - ७५.४६गोसे खुर्द (भंडारा)    - ३०.७५निम्न वर्धा (वर्धा)    - २८.८७असोळा मेंढा (चंद्रपूर)    - ९२.८२दिवा (गडचिरोली)    - ८१.४१

९०८ गाववाड्यांमध्ये टँकरवारी१३ आॅगस्टअखेर राज्यातील ५६७ गावे व ३४१ वाड्यांमध्ये ५९३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागात १०२, पुणे विभागात १४, मराठवाड्यात ४३५, तर अमरावती विभागातील बुलडाण्यात ४२ टँकरने पाणी पोहोचविले जात आहे. यात ७५ शासकीय व ५१८ खासगी टँकरचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रDamधरण