शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

बस्स! आता प्रतीक्षा २४ तासांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:59 PM

मतदानकार्य पार पाडल्यानंतर अमरावती लोकसभेतील मतदारांना असलेली मतमोजणीची प्रतीक्षा आता उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता मतमोजणी आरंभ होण्यासाठी मतदारांना २४ तास धीर धरावा लागणार आहे.

ठळक मुद्देउत्सुकता शिगेला : 'फाईट टफ' आहे राजेहो..

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मतदानकार्य पार पाडल्यानंतर अमरावती लोकसभेतील मतदारांना असलेली मतमोजणीची प्रतीक्षा आता उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता मतमोजणी आरंभ होण्यासाठी मतदारांना २४ तास धीर धरावा लागणार आहे.एकूण सात टप्प्यांपैकी अमरावती लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात अर्थात १८ एप्रिल रोजी मतदान पार पडले. १८ एप्रिल ते २३ मे हा मोठ्ठा कालावधी अमरावती लोकसभा क्षेत्रातील मतदारांच्या वाट्याला आला.मतमोजणी आटोपल्यानंतर लगबगीने उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जय-पराजयाची गणिते मांडली. प्रत्येक उमेदवाराकडे त्याचे स्वत:चे कॅल्क्यूलेशन आहे. कुठे बळ मिळाले नि कुठे दगा झाला, याच्या नोंदी उमेदवारांकडे मतदानानंतर आठवडाभरातच तयार होत्या. आजारी पडायलाही उसंत मिळू नये इतकी व्यस्तता निवडणूक काळात असल्यामुळे मतदानानंतर उमेदवारांनी आपापल्या सवडीने स्वत:साठी वेळ काढला. कुणी देवदर्शनाला गेले, तर कुणी कुटुंबासोबत वेळ घालविला. इतरांच्या प्रचारात सहभागही घेतला. विश्रांती आणि पक्षीय कार्य करून झाल्यावरही मतमोजणीची तारीख जवळ येत नव्हतीच. जणू २०१९ सालातील मे महिन्यात घड्याळाचे काटे मंद झाल्याचा भसा व्हावा, अशी मनस्थिती उमेदवारांची आणि त्यांच्या निकटस्थ मंडळींची झाल्याचे अनुभवता आले. ही प्रतीक्षा अवघ्या २४ तासांत संपून जिल्ह्याला १९ वे खासदार मिळणार आहेत.उद्या नेमाणी गोडाऊनमध्ये मतमोजणीअमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर, मिळालेल्या मतांची माहिती १० मिनिटांत सुविधा पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.१८ फेऱ्या, सहा वाजता उघडेल स्ट्राँग रूममतमोजणीच्या एकूण १८ फेºया होणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २० टेबल असतील. प्रत्येक टेबलासाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक मायक्रो आॅब्झर्व्हर असे तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता स्ट्राँग रूम उघडली जाईल. उमेदवार किंवा प्रतिनिधीद्वारे नोंदविलेल्या हरकतीची तिथेच सुनावणी होईल. यासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबविली जाणार नाही.गुरुवारी दारू दुकानांना टाळेमतमोजणीच्या दिवशी जिल्हाभरातील दारूची दुकाने दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.उत्सुकता नाही, विजयाचा विश्वास आहे. राज्यातदेखील ३५ पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार आहेत.- आनंदराव अडसूळ, महायुतीनऊ वर्षापासून मतदारसंघाच्या संपर्कात आहे. जनतेच्या आशीर्वादाने चमत्कार होऊन प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे.- नवनीत राणा, महाआघाडीसर्वच समाजघटकांनी बाळासाहेबांवर विश्वास ठेवून भरभरून मत दिले आहेत. ते मताधिक्य राहणार आहे. सर्व मतदारांचे आभार.- गुणवंत देवपारेवंचित बहुजन आघाडीमतदारांना कोण पाहिजे, हे आता कळेल. ज्यांनी मतदान केले, त्या सर्वांचे आभार. जनतेचा कौल मान्य राहील.- अरुण वानखडेबसपा