शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

जमील कॉलनीत १३ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:59 PM

इर्विन चौकात जलेबीचा व्यवसाय करणाऱ्या मो. अब्रार उल हक मो. इब्राहीम (२८) यांच्या जमिल कॉलनीतील घर फोडून चोरांनी तब्बल १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अब्रार यांनी त्यांच्या दुकानातील संतोष नावाच्या नोकरावर संशय व्यक्त केला असून सद्यस्थितीत तो पसार आहे.

ठळक मुद्देनोकरावर संशय : तक्रारकर्त्यांनुसार चोरटे बऱ्हाणपूरचेच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इर्विन चौकात जलेबीचा व्यवसाय करणाऱ्या मो. अब्रार उल हक मो. इब्राहीम (२८) यांच्या जमिल कॉलनीतील घर फोडून चोरांनी तब्बल १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केली. ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अब्रार यांनी त्यांच्या दुकानातील संतोष नावाच्या नोकरावर संशय व्यक्त केला असून सद्यस्थितीत तो पसार आहे.इर्विन चौकात जलेबीचा व्यवसाय करणाऱ्या अब्रार यांच्याकडे सहा जण कार्यरत आहे. त्यापैकी संतोष नावाच्या नोकराला अब्रारने १३ जून रोजी कामावरून काढून टाकले. तर, १४ जून रोजी आणखी दोन नोकर काम सोडून गेले. अब्रार हे मूळचे बऱ्हाणपूरचे आहे. त्यांच्याकडे काम करणारे सहाही जण हेसुद्धा बºहाणपुरचेच आहे. त्यामुळे हे तिन्ही नोकर बऱ्हाणपूर गेल्याचा अंदाज आहे. मात्र, संतोष हा बऱ्हाणपूर पोहोचला नसल्याची माहिती अब्रारला मिळाली आहे. शनिवारी सायंकाळी अब्रार जमिल कॉलनीत घरी असताना त्यांनी प्लॉट खरेदीसाठी जमा केलेले १३ लाख २५ हजार आलमारीत ठेवले होते. त्यानंतर ते इर्विन चौकातील दुकानात आले. रात्री ११.३० वाजता ते दुकान बंद करून घरी गेले असता घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त स्थितीत आढळून आले. घरातील आलमारी खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आली. अब्रार यांनी या घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सपाटे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा केला असता आलमारीतील १३ लाख १५ हजारांची रोख लंपास झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, घरात अन्य ठिकाणी ठेवलेली ५ लाख ३५ हजारांची रोख सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले.आलमारीवर आढळले रक्तअब्रार यांच्या घरातील आलमारी खाली पडून होती. त्यावर रक्ताचे डाग आढळून आले. चोर चोरी करीत असताना त्याच्याकडून आलमारी उघडली नसावी. त्यांनी आलमारी उघडण्याच्या प्रयत्न करून ती आलमारी खाली पाडली. यावेळी त्यांना काही तरी लागले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.